आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढला आहे. ८४ दिवसांनंतर एका दिवसात ४ हजार ४१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. २ हजार ३६३ जण बरे होऊन घरी परतले. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजार ११७ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत १० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात दोन मागील मृतांचा समावेश आहे. याबरोबरच आतापर्यंत कोरोनामुळे मृतांची संख्या ५ लाख २४ हजार ६५१ वर पोहोचली आहे. कोरोनामुळे बरे झालेल्यांचे प्रमाण ९८.७४ टक्के आहे. दररोजचा पॉझिटिव्हिटी दर ०.९५ टक्के, तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट ०.७३ टक्के अशी नोंद करण्यात आली आहे.
यादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. जुगलकिशोर म्हणाले, सध्या आढळलेले रुग्ण गंभीर लक्षणांचे नाहीत. रुग्णांमध्ये सामान्य तापाची लक्षणे दिसतील. तोपर्यंत फार चिंतेचे कारण नाही. परंतु रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासल्यास मात्र चिंता वाढू शकते. बाधितांना रुग्णालयात जाण्याची वेळ आली नाही तर कोरोना सामान्य तापासारखा आहे.कोरोनाचा वाढणारा संसर्ग पाहता मास्कसह इतर कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे निर्देश दिल्लीच्या उच्च न्यायालयाने दिले आहेत. मास्क आणि स्वच्छतेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दंड वसूल करावा. अशा प्रवाशांना नो फ्लाय लिस्टमध्ये समाविष्ट करावे. नप्रियंका गांधी यांनाही बाधा :काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्या क्वॉरंटाइन झाल्या आहेत. प्रियंका यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसली. त्यानंतर त्यांची तपासणी झाली होती. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रियंका लखनऊमध्ये दाखल झाल्या होत्या. एक जून रोजी त्या दिल्लीत परतल्या. त्याच्या एक दिवस आधी सोनिया गांधीदेखील कोरोनामुळे बाधित झाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.