आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचांदीची पुन्हा चांदी झाली आहे. बुधवारी प्रथमच चांदीचा दर ७५,३६५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला. तथापि, नंतर तो ७४,९४० रुपयांवर थांबला. यापूर्वी ७ ऑगस्ट २०२० रोजी किंमत ७५,०१३ रु. पर्यंत होती. म्हणजेच ९७७ दिवसांनंतर चांदी पुन्हा ७५ हजारी झाली होती. यापूर्वी ५ एप्रिल २०२३ रोजी सोन्यानेही ६०,७८१ रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी विक्रमी पातळी गाठली आहे.
यावर्षी आतापर्यंत चांदी ६,५९१ रुपये किलो आणि सोने ५,४५० रुपये तोळा इतके महाग झाले आहे. एप्रिलच्या मागील १० दिवसांत (३-१२ एप्रिल) चांदी ३,२४० रुपये किलो आणि सोन्याचा भाव ८९८ रुपये तोळा इतका झाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) मते, बुधवारी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६०,६१३ रुपयांवर थांबला. देशभरातील १४ केंद्रांतून सोन्या-चांदीचा सध्याचा दर घेत त्याच्या सरासरीच्या आधारे दर काढण्यात आले आहेत.
तिकडे... मार्चमध्ये ५.६६ टक्क्यांवर आला किरकोळ महागाई दर, तो १५ महिन्यांतील सर्वात कमी रू जीवनावश्यक वस्तुंच्या किमती कमी झाल्याने मार्चमध्ये किरकोळ महागाई दर ५.६६% वर आला. फेब्रुवारीत ६.४४% होता. यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये किरकोळ महागाई दर ५.६६% होता. म्हणजेच तो १५ महिन्यांच्या निचांकी पातळीवर आहे. मार्च २०२३ मध्ये अन्नधान्य महागाई दर ४.७९% राहिला. तो फेब्रुवारीत ५.९५% होता. किरकोळ महागाईत जवळपास अर्धा वाटा खाद्य पदार्थांचा असतो. वीज आणि इंधन महागाई दर ९.९% वरून ८.९१ टक्क्यांवर आला.
तज्ज्ञ म्हणाले, या वर्षी ९० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते चांदी केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, या वर्षी चांदी ९० हजार रु./किलोपर्यंत जाऊ शकते. औद्योगिक मागणी वाढल्याने आणि सोन्याचे दर जास्त असल्यानेही चांदीचे भाव वाढत आहेत. सिल्व्हर ईटीएफ आल्यामुळे चांदीत गुंतवणुकीचे पर्याय वाढल्याचाही परिणाम आहे.
आतापर्यंत चांदीने दिला १० वर्षांत केवळ २०% आणि १५ वर्षांत २४७% परतावा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.