आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटण्याच्या पुनपुनमध्ये शनिवारी एका व्यक्तीने 12 वर्षीय मुलाची गळा कापून निर्घृण हत्या केली. त्यानंतर आरोपी थेट वीज पुरवठ्याच्या हायटेन्शन टॉवरवर चढला. जवळपास 4 तास तो तिथे होता. जमावाने खालून दगडफेक केल्यामुळे तो खाली पडला. त्यानंतर लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो ठार झाला.
यावेळी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पण जमावाने त्यांना पळवून लावले. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यात अनेक पोलिस जखमी झाले. पोलिसांच्या मते, आरोपी तरुण मानसिकदृष्ट्या विकृत होता. त्याची अद्याप ओळख पटली नाही.
घटना शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली.
पोलिसांवर दगडफेक
पाटण्याचे ASP शुभम आर्या यांनी सांगितले की, पोलिसांना एका मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खबर आम्हाला मिळाली होती. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा गावकऱ्यांनी एका टॉवरला घेराव घातला होता. आरोपी मुलाचे शिर घेऊन टॉवरवर चढला होता.
संतप्त जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात अनेकजण जखमी झालेत. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केला.
जमावाचा रास्ता रोको
बबन कुमार असे मृत मुलाचे नाव आहे. तो पुनपुन पोलिस स्टेशन हद्दीतील अलाउद्दीनचक येथे राहत होता. करू सिंग असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. एएसपी, पालीगंज डीएसपीसह अनेक पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचलेत. आरोपीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. संतप्त जमावाने रास्ता रोको केला. पण पोलिसांनी वाहतूक सुरुळीत केली. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिस नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाटणा येथून शहर एसपी ईस्ट, सचिवालय एएसपी आणि इतर अनेक पोलिस ठाण्यांसह पथके पोहोचली आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.