आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिवाळीनंतर दिल्ली, केरळ, प. बंगाल आणि महाराष्ट्र या ४ राज्यांत कोरोनाची स्थिती पुन्हा स्फोटक झाली आहे. १५ ते १९ नोव्हेंबरपर्यंत देशात एकूण २.२२ लाख नवे रुग्ण आढळले. पैकी ५२% याच ४ राज्यांतील होते. देशात ५ दिवसांत २,९०३ मृत्यू झाले, पैकी ५८% याच ४ राज्यांत झाले. चिंताजनक बाब म्हणजे या चारही राज्यांत नव्या रुग्णांत सातत्याने वाढ होत असून इतर मोठ्या शहरांत हा आकडा स्थिर वा त्यात किरकोळ वाढ होत आहे.
संसर्गाकडे बघता गुजरातच्या अहमदाबाद, सुरत, राजकोट व बडोद्यात शुक्रवारी रात्री ९ पासून सोमवारी पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू झाली आहे. यानंतर रात्रीही कर्फ्यू असेल. मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, रतलाम व विदिशात रात्रीचाही कर्फ्यू असेल
हरियाणात ३० नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार शाळा, कर्नाटकात मात्र सुरू
हरियाणामध्ये १५० पेक्षा जास्त विद्यार्थी संक्रमित आढळल्यानंतर शाळा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. गुजरातमध्ये २३ नोव्हेंबरपासून शाळा उघडणार होत्या. मात्र निर्णय पुढे ढकलण्यात आला. हिमाचलमध्ये २५ नोव्हेंबरपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील. उत्तराखंडमध्ये शाळा उघडल्यानंतर फक्त ५ दिवसांतच बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, कर्नाटकात शाळा उघडल्या आहेत.
महाराष्ट्राने ओलांडला १ कोटी काेविड-१९ चाचण्यांचा टप्पा
मुंबई | महाराष्ट्रात आजवर १ कोटी ३५ हजार ६६५ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यात १७ लाख ६८,६९५ (१७.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५८,०९० व्यक्ती होम क्वाॅरंटाइन, तर ४,८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. राज्यात शुक्रवारी ६९४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण १६ लाख ४२ हजार ९१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ९२.८९ % झाला आहे.
छोट्या राज्यांत अॅक्टिव्ह रुग्ण जास्त... गेल्या १५ दिवसांत हिमाचल, लडाख, मिझोराम आणि नागालँडमध्ये नवे रुग्ण वेगाने वाढले आहेत. यामुळे या राज्यांत अॅक्टिव्ह रुग्ण १२% पेक्षा जास्त आहे. मात्र देशात ५% अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.