आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाथरसनंतर बलरामपुरमध्ये गँगरेप:22 वर्षांच्या दलित तरुणीवर अत्याचार, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्राण सोडले, आईने सांगितले - आरोपींनी मुलीची कंबर आणि पाय मोडले होते

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॉलेजची फीस जमा करण्यासाठी निघाली होती, 9 तासांनंतर बेशुद्धा अवस्थेत परतली
  • उभीही होऊ शकत नव्हते, बोलूही शकत नव्हती, फक्त म्हणाली - मी मरुन जाईल

उत्तर प्रदेशमधील हाथरसनंतर बलरामपूर जिल्ह्यातील दलित मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. 22 वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थितीनीला अपहरण करून इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. या नंतर दोन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. मुलीची अवस्था एवढी वाईट होती की तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी साहिल आणि शाहिद नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण गँसडी परिसरातील आहे.

बेशुद्ध अवस्थेत रिक्षातून घरी पोहोचली
मंगळवारी सकाळी दहा वाजता मुलगी महाविद्यालयीन फी जमा करण्यासाठी घराबाहेर पडली. संध्याकाळपर्यंत परत न आल्यास कुटुंबातील सदस्यांनी फोन केला पण फोन बंद होता. सायंकाळी 7 च्या सुमारास मुलगी गंभीर स्थितीत रिक्षातून घरी पोहोचली. तिच्या हातावर कॅनुला लावलेला होता. ती बेशुद्ध अवस्थेत होती आणि बोलूही शकत नव्हती. कुटुंबीयांनी तिला त्वरित डॉक्टरांकडे नेले. त्यानंतर डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांना लखनऊला नेण्यात आले, परंतु त्या तरुणीचा वाटेतच मृत्यू झाला.

पोटात प्रचंड जळजळ होतेय, मी मरुन जाईल
मुलीच्या आईने सांगितले की मुलगी महाविद्यालयातून परत येत होती, वाटेत कारमधील 3-4 लोकांनी तिचे अपहरण केले. तिला नशेचे इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपीने मुलीचे कंबरडे व पाय देखील तोडले त्यामुळे ती उभे राहू शकत नव्हती आणि बोलूही शकत नव्हती. ती एवढेच म्हणाले की, पोटात खूप जळजळ होतेय, मी मरुन जाईल.

आरोपीने डॉक्टरला बोलावले होते, परंतु त्याला संशय आला
गँसडी गावात किराणा स्टोरच्या मागील बाजूस ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पीडित मुलीचे सँडल त्याच खोलीच्या बाहेर सापडले. दुकान मालक हा या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. बलात्कार आणि प्राणघातक हल्ल्यानंतर आरोपीने पीडित मुलीवर जवळच्या डॉक्टरांकडून उपचार करण्याचा प्रयत्न केला होता.

डॉक्टरांनी सांगितले...
"संध्याकाळी 5 वाजता साहिल नावाच्या मुलाचा फोन आला. तो मला शाहिदच्या दुकानात घेऊन गेला. तिथे तो म्हणाला की, माझ्या एका फॅमिली मेंबरला पाहा. मी पाहिले की, खोलीत मुलीशिवाय कुणीही नव्हते. मी विचारले. हे कोण आहे? त्यांनी सांगितले की ती सरकारी सेक्रेटरीची मुलगी आहे. मी म्हणालो की जोपर्यंत एखादी महिला किंवा मोठी व्यक्ती येत नाही तोपर्यंत मी उपचार करु शकत नाही. त्यांनी मला म्हटले की, तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये जा, आम्ही सेक्रेटरीला बोलावून मुलीला घेऊन तिथेच येतो. यानंतर ते कुठे गेले हे मला माहिती नाही''

अंत्यसंस्काराच्या वेळी पोलिसांनी पुन्हा घाई केली
वृत्तसंस्था आयएएनएसच्या वृत्तानुसार, अंत्यसंस्काराच्या वेळी पोलिसांनी हाथरसच्या घटनेप्रमाणे घाई केली. मंगळवारी रात्री बलरामपूरमधील पीडितेचा मृतदेह देखील पोलिस दलाच्या तैनातीमध्ये मंगळवारी रात्री जाळण्यात आला. पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. तथापि, लोक म्हणत आहेत की पीडितेच्या कुटूंबाच्या संमतीनेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

अखिलेश यादव म्हणाले - भाजप सरकारने आता सारवासारव करु नये
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेता अखिलेश यादव यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हाथरस नंतर आता बलरामपुरमध्येही एका मुलीवर सामूहित बलात्कार आणि निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हा मोठा अपराध आहे. भाजप सरकारने बलरामपुरमध्ये हाथरससारखा निष्काळजीपणा करु नये, तर गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser