आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Hijab Controversy, BJP Now Promotes Hindutva Demand Not To Give Shops To Special Religious People During Yatra Karnataka | Marathi News

हिजाब वादानंतर आता भाजपकडून हिंदुत्वाला चालना:कर्नाटकात व्यवसायाच्या ध्रुवीकरणाचाही प्रयत्न, यात्रेत विशेष धर्मीयांना दुकाने न देण्याची मागणी

बंगळुरू / विनय माधव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमध्ये हिजाबच्या मुद्द्यावरून धार्मिक आधारावर लोक दोन गटांत विभागले जात आहेत. याच वेळी भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा अजेंडा राबवत आहे. एकीकडे गुजरातच्या पावलावर आता कर्नाटक सरकारनेही अभ्यासक्रमात नैतिक शिक्षण पुन्हा सुरू करण्याची आणि यात भगवद‌्गीतेचा एक विषय ठेवण्याची तयारी केली आहे. कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांच्या मते भगवद‌्गीता शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा अजेंडा तयार आहे. नैतिक शिक्षणाच्या रूपात ती शिकवली जाईल. त्यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णांचेही हेच मत होते. ते म्हणाले होते की, तेसुद्धा भगवद‌्गीता वाचतात आणि यामुळे त्यांना मनोबल मिळते.

महात्मा गांधीही भगवद‌्गीता वाचण्याच्या बाजूने होते. यासाठी तज्ज्ञांशी बोलणे सुरू आहे. भगवद‌्गीतेसह बायबल आणि कुराणातील काही चांगले मुद्दे अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाऊ शकतात. इकडे, कर्नाटक सरकारच्या या पावलांमुळे विरोधकांकडून कडवट प्रतिक्रिया मिळत आहेत. भाजप भगवद‌्गीतेची ओळख करून देऊन समाजाचे आणखी विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. दक्षिण कन्नडमधील कौंपमध्ये मरिकंबा जत्रेचे आयोजन केले जाते. २२-२३ मार्च रोजी होणाऱ्या यात्रेत इतर धर्माच्या व्यापाऱ्यांना दुकाने देण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

हिजाबप्रकरणी विरोधी निदर्शनांसह वर्गावर बहिष्कारही टाकला
हिजाबप्रकरणी दक्षिण कन्नड जिल्ह्यात वाद सुरूच आहे. उप्पनंगडीत २८ हून अधिक मुलींनी परीक्षा केंद्रात हिजाबची परवानगी देण्याच्या मागणीवरून कॉलेजबाहेर निदर्शने केली. परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही घेतला, तर काही मुलेही त्यांच्या निदर्शनांत सहभागी झाली. काही मुस्लिम नेत्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा न देण्यास सांगितले. परंतु ते अयशस्वी ठरले.

बातम्या आणखी आहेत...