आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After His Visit To Leh, The Prime Minister Called On President Ramnath Kovind And Held A Half hour Discussion On Issues Of National And International Importance.

चर्चा:लेह दौऱ्यानंतर पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट, राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय स्तरावरील महत्वांच्या विषयांवर अर्धा तास चालली चर्चा 

नवी दिल्‍ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-चीन सीमेवरील तणाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान पंतप्रधानांनी अचानक लेह दौरा केला. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. या भेटीत पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय स्तरावरील अनेक महत्वांच्या विषयावर चर्चा झाली. अर्धा तास ही बैठक सुरू होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी 11.30 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले. सुमारे अर्ध्या तासाच्या या बैठकीत या दोघांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची माहिती नाही.  एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली.

अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी भारत आणि चीनमधील परिस्थितीबद्दल राष्ट्रपतींशी चर्चा केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांपूर्वी लेहहून परत आले आहेत. शुक्रवारी सकाळी पंतप्रधान मोदी अचानक लेह येथे पोहोचले. यावेळी त्यांनी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना संबोधित केले. नंतर ते जखमी सैनिकांना भेटले.

बातम्या आणखी आहेत...