आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:कर्नाटकात मोदींच्या दौऱ्यानंतर भाजप प्रचाराचा धडाका लावणार

बंगळुरू | विनय माधव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या आधी विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीने भाजपला अस्वस्थ केले आहे. पक्षाला चारपैकी दोन जागी समाधान मानावे लागले. तेवढ्याच जागा जिंकून काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. वास्तविक हा निकाल एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जद (एस) पक्षासाठी निराशा करणारा ठरला आहे. जेडीएसला मांड्या-म्हैसूर या बोलकिल्ल्यातच पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसच्या विजयाने भाजप चिंतित आहे. या निकालाने भाजपमधील नेत्यांच्या एका गटाची चिंता वाढवली आहे. कारण कर्नाटकात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी केवळ एक वर्षाचा कालावधी राहिला आहे. म्हणूनच अशा प्रकारची सामान्य कामगिरी मान्य केली जाऊ शकत नाही. त्यातच पंतप्रधान मोदी २१ जून रोजी योग दिन समारंभात सहभागी होण्यासाठी शहराला भेट देणार आहेत.

त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांत अस्वस्थता दिसू शकते.एवढेच नाही तर विधान परिषदेच्या निकालाबद्दल मोदींनी काही विचारणा केल्यास पराभवाचे कारण सांगतानादेखील स्थानिक नेत्यांची फजिती होईल, असे भाजपला वाटते. परंतु मोदींच्या आगमनाबरोबरच प्रचाराचा धडाका लावला जाणार आहे. त्यासाठी भाजप तयारीला लागले आहे. पक्ष पश्चिम बंगालच्या धर्तीवर आक्रमक पद्धतीने प्रचारावर भर देणार आहे. तसे तर निवडणुकीला आणखी दहा महिन्यांचा अवधी आहे, परंतु भाजप १५० जागा मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. पक्षाच्या विधान परिषदेतील वाईट कामगिरीसाठी म्हैसूर येथील पक्षीय मतभेद कारणीभूत ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. नॉर्थवेस्ट टीचर्स मतदारसंघात पक्षाचा अपेक्षाभंग करणाऱ्या कामगिरीने नेत्यांना त्रस्त केले आहे. मुंबई-कर्नाटक क्षेत्राने पारंपरिक पद्धतीने भाजला कौल दिला होता. भाजपकडे बेळगाव, विजयपुरा, बागलकोट जिल्ह्यांत २० पेक्षा जास्त आमदार व ४ लोकसभा सदस्य आहेत. मोदींच्या दौऱ्यानंतर संघाने २३ व २४ जून रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूत काही वरिष्ठ मंत्र्यांची बैठक आयोजित केली आहे.

भाजप-काँग्रेस स्वबळावर प्रयत्नशील, देवेगौडांची वेगळी रणनीती
येदियुरप्पा फॅॅक्टर सांभाळला नाही तर मोठे राजकीय आव्हान शक्य

विधान परिषदेतील सुमार कामगिरीनंतर भाजपला आता पक्षाचे लिंगायत समाजाचे दिग्गज नेते येदियुरप्पा यांच्या नाराजीमुळे अस्वस्थता वाटू लागली आहे. म्हणूनच अमित शहा राज्याच्या दौऱ्यात कर्नाटकातील मठांनादेखील भेट देणार आहेत. परंतु येदियुरप्पा यांना सांभाळले नाही तर मोठे राजकीय आव्हान निर्माण होऊ शकेल, असे पक्षाच्या अनेक नेत्यांना वाटते.

काँग्रेसला आता सरकारच्या अँटी इन्कम्बन्सीचा मोठा आधार वाटतो
भाजपचे हिंदुत्ववादी मुद्दे तसेच पंतप्रधान मोदी यांच्या चेहऱ्याचा विचार करता कर्नाटकात काँग्रेसला भाजप सरकारविरोधी भावनेवर स्वार होण्याची घाई झालेली दिसते. तोच त्यांचा आधार आहे. दक्षिणेकडील पकड व भाजपअंतर्गत असंतोषाचा फायदा घेण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. जेडीएसचे देवेगाैडा मात्र. ते भाजप किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही मोठ्या पक्षासोबत सरकारमध्ये जातील.

बातम्या आणखी आहेत...