आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Niranjani And Anand Akhada, Now The Juna Akhada Also Announced The End Of Kumbh

हरिद्वार कुंभ समाप्त:निरंजनी आणि आनंद आखाड्यानंतर आता जुना आखाड्यानेही केली कुंभ समाप्तीची घोषणा

हरिद्वार9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर साधू-संतांनी हरिद्वार कुंभमेळा निश्चित वेळेपूर्वी समाप्त करण्याची घोषणा केली आहे. कुंभमेळ्यात आता प्रतीकात्मक स्तरावर धार्मिक आयोजन होत राहतील. यापूर्वी कोरोनाचे वाढते संक्रमण पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद यांच्याशी चर्चा केली. त्यांनी संतांना आवाहन केले की, कोरोना संकटामुळे आता कुंभला प्रतीकात्मक ठेवावे. जुना आखाडाकडून शनिवारी संध्याकाळी कुंभ समाप्तीची घोषणा करण्यात आली. निरंजनी आणि आनंद आखाड्याने यापूर्वीच कुंभ समाप्तीची घोषणा केली आहे.

काही आखाडे वेळेपूर्वी कुंभ समाप्त करण्याच्या घोषणेने नाराज होते. त्यांची इच्छा कुंभमेळा ठरलेल्या वेळेपर्यंत चालू राहावा अशी होती. या साधू-संतांची मनधरणी करण्यासाठी उत्तराखंड सरकारच्या मागील 2 दिवसांपासून गुप्त बैठका सुरु होत्या.

बातम्या आणखी आहेत...