आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • After Operation Scindia, Zafar Islam's Name Came Up Again In The Discussion, He Played An Important Role In The Discussion Between BJP And Pilot

काँग्रेस बंडखोर आणि भाजपमधील दुवा:ऑपरेशन सिंधियानंतर जफर इस्लाम यांचे नाव पुन्हा चर्चेत आले, भाजप आणि पायलट यांच्यातील चर्चेत त्यांची महत्त्वाची भूमिका

जयपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मध्यप्रदेशात सिंधियांना भाजपात आणण्यात पक्षाचे प्रवक्ता जफर इस्लाम यांची मोठी भूमिका होती
  • जफर इस्लाम यांनी पायलटशी देखील संपर्क साधला, हाय कमांडला देताहेत अपडेट्स
Advertisement
Advertisement

राजस्थानमधील राजकारणाचे चित्र मध्य प्रदेशसारखेच आहे. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया पक्षावर नाराज होते. राजस्थानमध्ये सचिन पायलट नाराज आहेत. सिंधिया 4 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले आणि मध्यप्रदेशात भाजपचे सरकार आले. सिंधियांना मिळवण्यासाठी आणि ऑपरेशन लोटस यशस्वी करण्यात भाजपाचे प्रवक्ते जफर इस्लाम यांची मोठी भूमिका होती. आता राजस्थानमधील घटनाक्रम पाहता जफर इस्लाम यांच्या नावाची चर्चा होत आहे.

  रविवारी सिंधिया आणि पायलट यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त होते. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दीड वाजता दोघांची भेट झाली. सुत्रांच्या माहितीनुसार या भेटीनंतर जफर इस्लाम पायलट यांच्या संपर्कात आहेत आणि सर्व राजकीय गणिताबाबत ते भाजप उच्च कमांडला सतत अपडेट देत आहेत.  

जफर इस्लाम यांचे सिंधियांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे सिंधियांना भाजपमध्ये आणण्याची जबाबदारी झफर इस्लामवर सोपवली होती.

कोण आहे जफर इस्लाम?

जफर इस्लाम यांचे पूर्णनाव डॉ. सय्यद जफर इस्लाम असून ते भाजपचा उदारमतवादी मुस्लिम चेहरा आहेत. त्यांची भाजपामधील कारकीर्द अवघ्या 7 वर्षांची आहे, परंतु त्यांचे महत्व वेगाने वाढले आहे. भाजपचे प्रवक्ता म्हणून जफर माध्यमांसाठी एक प्रसिद्ध चेहरा आहे. टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत ते दररोज भाजपची बाजू मांडतात आणि काटेकोर प्रश्नांपासून पक्षाचा बचाव देखील करतात.  राजकारणात येण्यापूर्वी ते ड्यूश बँकेचे एमडी होते आणि परदेशात होते. सध्या ते भाजप प्रवक्त्याव्यतिरिक्त एअर इंडियाच्या बोर्डावर स्वतंत्र संचालक देखील आहेत.

फोटो 6 एप्रिल 2014 चा आहे. जेपी नड्डा यांनी जफर इस्लाम यांचा भाजपात प्रवेश केला होता.

भाजप उच्च कमांडचा जफर यांच्यावर विश्वास 

मोदींच्या राजकारणाने प्रभावित होऊन जफर इस्लाम यांनी भाजपमधून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. जफर यांचे पीएम मोदींसोबत चांगले संबंध आहेत आणि ते अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्या गुडबुकमध्ये देखील आहेत. 2013 मध्ये जेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा आपण डॉईश बँकेचे एमडी असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांना सांगितले. योगायोगाने त्यांची आणि नरेंद्र मोदींची भेट झाली. यावेळी मोदींनी आपल्या राष्ट्रबांधणीच्या स्वप्नात सामील होण्याची त्यांना ऑफर दिली. जफर म्हणाले की, आता मी भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे. आता आपल्या लोकांमध्ये जाऊन पंतप्रधान मोदींच्या व्हिजन मांडतो. 

Advertisement
0