आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Rajouri And Kathua, The Ban On Drones In Srinagar Will Now Have To Be Deposited At The Police Station

जम्मू-काश्मीर:राजौरी आणि कठुआनंतर आता श्रीनगरमध्येही ड्रोनवर बॅन, आता पोलीस स्टेशनमध्ये जमा करावे लागतील

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू हवाई दल स्टेशनवर हल्ला झाल्यानंतर सुमारे आठवडाभरानंतर श्रीनगर प्रशासनाने ड्रोनवर बंदी घातली आहे. यापूर्वी राजौरी आणि कठुआमध्येही बंदी लागू करण्यात आली आहे. आता श्रीनगरमध्ये ड्रोनच्या विक्री आणि खरेदीवर बंदी असेल. ज्यांच्याकडे ड्रोन आहेत त्यांना ते पोलिस ठाण्यात जमा करावे लागतील.

3 जुलै रोजी श्रीनगरचे जिल्हाधिकारी मोहम्मद अजीज यांनी एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार, ज्या लोकांकडे ड्रोन कॅमेरा किंवा तत्सम इतर उपकरण आहेत, ते त्वरित नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये जमा करावे लागतील.

जम्मू एअरफोर्स स्टेशनवर झाला होता ड्रोन हल्ला
26 जून रोजी उशिरा रात्री जम्मू हवाई दल स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला आणि त्यात दोन जवान किरकोळ जखमी झाले होते. येथे 5 मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट झाले होते. दोन दिवसांनंतर जम्मूमध्येच कालूचक मिलिटरी स्टेशनवर 2 ड्रोन दिसले होते. त्यांना खाली पाडण्यासाठी सैन्याने गोळीबार केला, पण ते अंधारात गायब झाले. त्यानंतर, सैन्याने संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली आहे.

एअरफोर्स स्टेशनवरील हल्ल्यादरम्यान, ड्रोनद्वारे दोन IED एअरबेसच्या आत टाकण्यात आले होते. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. या हल्ल्यानंतर थोड्याच वेळात एका लष्कर दहशतवाद्याला 6 किलो स्फोटकांसह अटक करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...