आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Selling The Saffron Box To Buy Rice For His Brother, He Went To Rajamaili's House To Teach Dance To His Children.

दिव्य मराठी विशेष:कुंकवाची डबी विकून भावासाठी तांदूळ खरेदी केले हाेते, राजामाैली यांच्या मुलांना नृत्य शिकवण्यासाठी त्यांच्या घरी जात हाेताे

हैदराबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळ बदलत असते. चांगल्याचे वाईट आणि वाईटातून चांगले घडते. मी १९९३ चा ताे दिवस कधीही विसरू शकत नाही. मला चेन्नईतील माझे कुटुंब, घरदार साेडून निघावे लागले हाेते. परिस्थितीचा ताे रेटा हाेता. वडील फार पूर्वी हिरा व्यापारी हाेते. परंतु नंतर ते डान्सर्स अँड डान्स डायरेक्टर्स युनियनमध्ये कॅशियर हाेते. ८०० रुपये पगार हाेता. त्या हलाखीच्या काळात या पैशांचाच आधार हाेता. मला एक जाेडी कपडे हाेते. त्याला रात्री धुऊन सकाळी काम शाेधायला जात असे. मी कठीण काळात दहावी उत्तीर्ण झालाे. मग एका टेलरकडे काम केले. १९९४ मध्ये एका बुधवारी घरी परतलाे.

तेव्हा माझा धाकटा भाऊ पाेटातील वेदनेने विव्हळत हाेता. ताे मुका आणि बहिरा हाेता. त्याने दाेन दिवसांपासून काही खाल्ले नव्हते. आईकडे छाेटीशी कुंकवाची डबी हाेती. ती चांदीची हाेती. मी ती डबी घेऊन आैषधीच्या दुकानावर गेलाे. त्यावर दुकानदार म्हणाले, तू डबी ठेव आणि त्याने खिशातून २० रुपये दिले. मी धावत जाऊन २० रुपयांचे तांदूळ आणले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भात खाल्ला. पैशांची काय किंमत असते हे मला समजले हाेते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी मी साईबाबांच्या मंदिरात गेलाे. भगवंताला म्हणालाे, मी ख्रिश्चन असून तुम्हाला शरण आलाे. पैशांची तंगी खूप वाढली. त्यामुळे मंदिरातून बाहेर पडलाे आणि आत्महत्येचा विचार केला. उधारीतील सायकलवरून मरिना ब्रिजकडे निघालाे. मग मी विचार केला. सायकलचा मूळ मालक आपल्या वागण्यामुळे वैतागून जाईल. म्हणून ती सायकल वडिलांकडे ठेवायला गेलाे.

सायकल देऊन मी वळलाे ताेच वडिलांनी आवाज दिला. माझ्या वडिलांचे मित्र सुंदरम मास्टर यांनी एक्स्ट्रा डान्सर म्हणून काम करण्यास सांगितले. माझ्या मनात एकच गाेष्ट येत हाेती-श्रद्धा-सबुरी. धैर्य रखाे. संयम ठेवावा. ताे सगळे पाहताेय. वेळ निघून जात हाेती. हैदराबादच्या डान्स स्कूलमध्ये डान्स शिकवल्यानंतर २००२ उजाडेपर्यंत मी काेरिअाेग्राफर झालाे हाेताे. आता मी दरराेज एक ऑड स्टेप कंपाेज करत हाेताे. वर्षाच्या ३६५ स्टेप. असे दहा वर्षे चालले. पैशांची गरज आजही हाेती. त्यामुळे मी राजामाैली व किरवानी सरांच्या मुलांना नृत्य शिकवण्यास सुरुवात केली. सायंकाळी ५ वाजता राजामाैली सरांची पत्नी रमा जेवण्याची विचारपूस करत,मी संकाेचाने हाेकार देत असे. विद्यार्थी चित्रपटासाठी मी काेरिअाेग्राफी केली हाेती. परंतु हा जाॅब जाईल या भीतीने मी राजामाैलींना सांगितले नाही. पण माहीत झाल्यावर त्यांनी आपला चित्रपट छत्रपतीच्या काेरिअाेग्राफीची संधी दिली. मला नृत्य समजत हाेते. कॅमेरा अँगल कळत नव्हता. नाटू-नाटू गीताच्या स्टेप्सची कहाणी रंजक आहे.

गाण्याची संकल्पना समजावताना राजामाैली म्हणाले, बेस्ट डान्सर्स राम चरण, ज्युनियर एनटीआर यांच्यासाेबत दाेन मित्र, दाेन भाऊ किंवा कुणीही सहजपणे नृत्य करू शकेल, अशा स्टेप्स असाव्यात. दाेन्ही स्टार्सची ऊर्जा, व्यक्तिमत्वाचा ताळमेळ बसवण्यासाठी ११० हुक स्टेप तयार केल्या. या स्टेप्स प्रेक्षकांना थबकून ठेवतात. रमा यांनी काॅश्च्युमबद्दल माहिती दिली. दाेन्ही स्टार्स काेट उतरवून डान्स करतील, अशी त्यांची सूचना हाेती. या प्रसंगात चार्ली चॅप्लिन व टाॅम अँड जेरीने प्रेरित हाेऊन नृत्यात सस्पंेडर्सना प्राॅप म्हणून वापरले. आज मी निवडक चित्रपटांत कन्सेप्ट काेरिओग्राॅफी करताे. माझ्या पडत्या काळात मी राहत असलेल्या रस्त्यावर अनेक मित्र झाले. आता ते रस्त्याच्या कडेला टॅलेंटेड डान्सर्सबद्दल माहिती देतात. त्यांना मी चित्रपटांत संधी व नाव देताे.

बातम्या आणखी आहेत...