आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • After Six Months Of Corona Period , Schools In Many States Will Start From Today, Requiring Written Permission For Students In Grades 9 12.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळ:कोरोना दुष्टचक्रात सहा महिन्यांनंतर अनेक राज्यांत आजपासून शाळा सुरू, 9 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लेखी परवानगी गरजेची

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या राज्यांतील शाळा सुरू होणार, महाराष्ट्रात शाळांबाबत 16 नोव्हेंबरनंतरच विचार

देशात कोरोना महामारीच्या दुष्टचक्रामध्ये सुमारे सहा महिन्यांनंतर सोमवारपासून काही राज्यांमध्ये शाळा पुन्हा सुरू होतील. मात्र, कोरोनाचा फैलाव जास्त असणाऱ्या राज्यांमध्ये शाळा तूर्तास बंद असणार आहेत. केंद्राच्या दिशानिर्देशानुसार, कंटेनमेंट झोनबाहेरील शाळांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पालकांचे संमतीपत्र असणे गरजेचे असणार आहे. तसेच शाळांनाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोरोनासंबंधित दिशानिर्देशांचे पालन करावे लागेल.

या राज्यांत काही अटींसह शाळा सुरू होणार

मध्य प्रदेशात एसओपीचे पालन गरजेचे. बिहार, हरियाणा, हिमाचल, आंध्रात ५० % शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी. पंजाबमध्ये पीएचडी व तांत्रिक, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या उच्च शिक्षण संस्था उघडतील. शाळा, महाविद्यालये व कोचिंग सेंटर बंदच असतील.

येथील शाळा बंदच राहणार

महाराष्ट्र, उ. प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड, राजस्थान, गुजरात व केरळमध्ये शाळा बंद असणार आहेत. यापैकी काही राज्यांनी यापूर्वी शाळा सुरू करण्याची घोषणा केली होती, मात्र नंतर निर्णय बदलण्यात आला. दिल्लीत ५ ऑक्टोबरपासून शाळा उघडणार आहेत.

महाराष्ट्रात शाळांबाबत १६ नाेव्हेंबरनंतरच विचार

राज्यात ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शाळा १६ नाेव्हेंबरनंतरच सुरू होऊ शकतील. दरम्यान, २१ सप्टेंबरपासून मुंबई उपनगरीय लोकल सुरू होतील. सहकारी व खासगी बँकांत १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची मुभा असेल. राज्य परिवहन बस १०० टक्के प्रवासी क्षमतेने सुरू झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...