आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मास्कमध्ये राजकारण:शपथ घेतल्यानंतर सिंधियांनी घेतली दिग्विजयसिंहांची खास भेट

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिवेशन सुरू नसतानाही उघडले राज्यसभेचे द्वार

अधिवेशन सुरू नसतानाही खासदारांच्या शपथग्रहणासाठी राज्यसभेची द्वारे उघडली. हा एक इतिहास ठरला. पावसाळी अधिवेशनाआधी या कार्यक्रमात मुसळधार पावसाने नव्या खासदारांचे स्वागत केले. कोरोनामुळे २५० सदस्यांच्या सभागृहात नवनिर्वाचित ६१ पैकी ४५ खासदारच उपस्थित होते. या खासदारांनीच शपथग्रहणाची संमती कळवली होती. केवळ राष्ट्रवादीच्या खासदार डाॅ. फौजिया तहसीन अहमद खान संमती देऊनही पोहोचू शकल्या नाहीत. या समारंभात नजरा भाजप खा. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर होत्या. सत्ताधारी पक्षाच्या रांगेतून उठून काँग्रेस पक्षाचे खासदार बसलेल्या रांगेकडे ते गेले. हात जोडून त्यांनी अगोदर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि दिग्विजयसिंह यांना नमस्कार केला.