आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahil Gandhi On Modi Government This ‘omniscient’ Govt’s Endless Arrogance Has Brought Economic Disaster For The Entire Country.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्र सरकारवर हल्लाबोल:खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले, म्हणाले - 'लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच; आधी आवाज दाबला, आता निलंबित केलं'

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं असल्याचं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला.

रविवारी राज्यसभेत कृषिसंबंधीत दोन विधेयक मंजूर करण्यात आली. यावेळी काँग्रेस आणि इतर पक्षांकडून कडाडून विरोध करण्यात आला. राज्यसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. यानंतर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी ही खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांतील आठ खासदारांना संसदेच्या उर्वरित अधिवेशनापर्यंत निलंबित केले आहे. खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदींवर संतापले आहेत.

राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं असल्याचं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला. ते म्हणाले की, 'लोकशाही देशाला गप्प बसवणं अजुनही सुरूच आहे. सुरुवातीला आवाज दाबण्यात आला. आता खासदारांना निलंबित करण्यात आलं आणि शेतकऱ्यांसाठी आणलेल्या काळ्या कायद्याकडे डोळेझाक करण्यात केली गेली. या सर्वज्ञानी सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात लोटले आहे.' असं म्हणत राहुल गांधींनी संताप व्यक्त केलाय.

निलंबित केलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसचे राजीव सातव यांचा देखील समावेश आहे. निलंबित करण्यात आलेल्या इतर खासदारांची नावे, डेरेक ओ’ब्रायन, संजय सिंह, केके रागेश, रिपुन बोरा, डोला सेन, सय्यद नजीर हुसैन आणि इलामारन करीम अशी आहेत. या सर्वांवर उपसभापतींसोबत असंसदीय वर्तन करण्याचे आरोप आहेत.

बातम्या आणखी आहेत...