आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७ फेब्रुवारीचा दौरा निवडणुकीची घोषणा मानली जात आहे. पंतप्रधान हल्दियातून राज्यासाठी ४५०० कोटींपेक्षा जास्तीच्या तेल-वायू आणि रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन-भूमिपूजन करतील. बंगालच्या राजकारणात योजना-घोषणांच्या स्पर्धेत भाजप केंद्रीय प्रकल्पाच्या भरवशावर आहे, तर तृणमूलने गावे-पंचायतींमध्ये राज्य सरकारच्या योेजना पोहोचवण्याचा मार्ग निवडला आहे. मात्र ताकीद दिली जाते की, हा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा दीदींना पुन्हा सत्ता मिळेल. राज्य सरकारच्या आरोग्य विमा योजनेसाठी प्रत्येक घरातील लोकांचे आरोग्य कार्ड बनवले जात आहे. या कामासाठी नगरपालिका, पंचायती पूर्ण ताकदीने लागल्या आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते लोकांना सांगत आहेत की, दीदी सत्तेत आली तरच त्यांना कार्डाचा फायदा होईल. एखाद्या गल्लीत, गावात समस्या असल्यास त्याची माहिती नगरपालिका वा पंचायतीला त्वरित द्यावी, शासकीय अधिकारी-कर्मचारी तेथे लगेच पोहोचतील, अशी सरकारने व्यवस्था केली आहे.
दोन्ही पक्षांतील वादाचा परिणाम हल्दियातील कार्यक्रमावरही दिसेल. २३ जानेवारीला नेताजी जयंतीच्या कार्यक्रमातील वादानंतर आता हल्दियातील कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत.
हल्दिया क्षेत्रात येतात १६ मतदारसंघ...पूर्ण द. बंगाल
पीएम हल्दियात पेट्रोलियम मंत्रालयाच्या निमंत्रणावरून येत आहेत. ते रिफायनरीत इंडियन ऑइलच्या लुब्रिकंटआधारित ऑइल कारखान्याचे भूमिपूजन करतील. ऊर्जा गंगा योजनेअंतर्गत धोबी ते दुर्गापूरदरम्यानच्या ३४७ किमीच्या वायुवाहिनीचे लोकार्पण व रानीचकमध्ये रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन करतील. हल्दिया पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात येते. यात हल्दियासह १६ मतदारसंघ तामलुक, पांशकुडा पूर्व, पांशकुडा पश्चिम, माेयना, नंदकुमार, महिशाडाल, चांदीपूर, पाताशपूर, कांठी उत्तर, भगवानपूर, खेजुरी, कांठी दक्षिण, एगरा, रामनगर, नंदीग्रामचा समावेश आहे. नंदीग्राममधून स्वत: दीदी रिंगणात आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.