आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संकटात भर:भारतात मोठ्या शहरांनंतर आता कोरोनाने छोट्या गावांना व्यापले; डॉक्टर, परिचारिका, लॅब तंत्रज्ञांची कमतरता

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लहान शहरांत वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने धोका जास्त

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटने दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांत कहर केला. रुग्णालयांत ऑक्सिजन व खाटा उपलब्ध होत नाहीत, परंतु आता कोरोनाची दुसरी लाट देशातील लहान शहरे, गावांत पसरू लागली आहे. ही शहरे पहिल्या लाटेत संसर्गापासून दूर होती. वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने ग्रामीण भागातील समस्या मोठी आहे. अडचणीही मोठ्या आहेत. त्यामुळे लोकांना चांगल्या उपचारासाठी नातेवाइकांना घेऊन शहरांच्या दिशेने धाव घेतल्याविना पर्याय उरलेला नाही.

गेल्या चोवीस तासांत जयपूरच्या खासगी रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये ऑक्सिजनसाठी लोक भटकत आहेत. दिल्लीच्या सराय काले खां स्मशान घाटावर अंत्यसंस्कारासाठी आणखी व्यवस्था केली जाणार आहे. उत्तर प्रदेशात विषाणू आर २.१४, झारखंडमध्ये २.१३, बिहार-२.०९ आहे. हे रिप्रोडक्शन नंबर आहेत. म्हणजे एका व्यक्तीकडून सरासरी लोक बाधित होत आहेत. विषाणू किती वेगाने पसरतोय याच्या परीक्षणासाठी आर क्रमांकाचा वापर केला जातो.

कबीरधाम : सात व्हेंटिलेटर, पण चालवणारे तज्ज्ञ नाहीत
छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यात १ मार्चपर्यंत अनेक सक्रिय रुग्ण नव्हते. परंतु गेल्या एक आठवड्यात येथील रुग्णसंख्या तीन हजारांवर गेली. रुग्णालयांत सात व्हेंटिलेटर आहेत, परंतु त्याला चालवणारे तज्ञ नाहीत. रुग्णालयात परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञांचाही अभाव आहे. त्यामुळे लोकांना योग्य उपचार मिळत नाही.

प्रयागराज: एप्रिल महिन्यात सुमारे ३२ टक्के मृत्यू
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात २० एप्रिलपर्यंत कोरोनाचे ५४,३३९ रुग्ण होते. त्यानंतर नवी रुग्णसंख्या २१ टक्के वाढली. गेल्या आठवड्यात ११३१८ रुग्ण आढळले, ६१४ जणांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात ३२ टक्के मृत्यू झाले. मृतांचा खरा आकडा सरकारी दस्ताऐवजाहून जास्त आहे. ऑक्सिजन व आैषधींच्या तुटवड्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

भागलपूर : नेहरू मेडिकल कॉलेजचे बेड फुल
बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात २० एप्रिलपर्यंत नवे रुग्ण २६ टक्के वाढले तर ३३ टक्के मृत्यू झाले. जवाहरलाल नेहरू मेडिकल महाविद्यालयातील सर्व युनिट्स २८ एप्रिलपर्यंत भरलेले होते. गेल्या दहा दिवसांत २२० डॉक्टरांपैकी ४० जण कोरोनानेबाधित झाले आहेत. त्यापैकी चार डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.

कोटा: २७ दिवसांत दुप्पट, आठवड्यात ६ हजार रुग्ण
राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ६ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आणि मृतांची संख्या सुमारे २६४ आहे. सर्वाधिक मृत्यू एप्रिलमध्ये झाले. गेल्या ७ एप्रिलपर्यंत नव्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ७२ दिवसांचा होता. आता २७ दिवसांत ते दुप्पट होत आहे. रुग्णालयांत ऑक्सिजनच्या खाटा नाहीत.

विषाणूला ट्रॅक करण्यात चूक, परिस्थिती बिघडली
भारतात सध्या कोरोनामुळे वाईट परिस्थिती आहे. परंतु त्यामागे केवळ डबल म्युटेंट किंवा बी. १.६१७ व्हेरिएंट हेच कारण सांगितले जाते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मात्र जगभरात इतर ठिकाणीही घातक स्वरूपातील विषाणू आढळले आहेत. न्यूयॉर्कच्या बेलव्यू रुग्णालयातील डॉ. सेलाइन गाउंडर म्हणाले, भारतात विषाणूविरोधातील लढा गांभीर्याने घेण्यात आला नाही. तसे काम झाले नाही. एवढे रुग्ण आल्यानंतर जीनोम सिक्वेसिंगवर लक्ष केंद्रित केले नाही. तामिळनाडूचे व्हायरोलॉजिस्ट डॉ. थेक्केरा जॅकब जॉन म्हणाले, नव्या स्वरूपातील विषाणूवर फार लक्ष केंद्रित केले गेले नाही.

बातम्या आणखी आहेत...