आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ऑन द स्पॉट:चीनशी वाद शमल्यानंतर गलवानजवळ स्थितीत सुधारणा, लडाखमधील मान-मेराक या अखेरच्या गावात आता जनजीवन पूर्ववत, फोनची सेवाही सुरू

मोरूप स्टॅनजिन | मान-मेराक गाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पँगाँग सरोवराजवळ मुलांचा बिनधास्त वावर, फिंगर-फोरजवळील हे गाव पर्यटकांसाठी झाले खुले... लोक सांगताहेत, आता सर्व सुरळीत

चीन सीमेवर तणावाचे वातावरण असले तरी लडाखमधील मान-मेराक या शेवटच्या रहिवासी गावात आता जनजीवन पूर्ववत झाले आहे. सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. दूरसंचार यंत्रणा सुरळीत झाली आहे. पर्यटकांनाही आता अडवले जात नाही. फिंगर-फोरजवळील पँगाँग सरोवरावराजवळ आता मुले आणि स्थानिक लोक बिनधास्त फिरत आहेत. येथे खे‌ळत असलेल्या मुलांशी भारत-चीन तणावाबाबत चर्चा केली असता ते म्हणतात... भारतीय लष्कराने चिनी लष्कराला पिटाळून लावले आहे. एरिया कौन्सिलर (स्थानिक लोकप्रतिनिधी) स्टॅनजिन कॉनचॉक म्हणाले की, १५-१६ जूनच्या गलवान खोरे घटनेनंतर २ महिन्यांपर्यंत येथे लोकांनी घरांत आणि लष्कराच्या कडक पहाऱ्यांत आयुष्य व्यतीत केले. आता जनजीवन पूर्ववत होत आहे. लष्कराने आणि स्थानिक लोकांनी रस्ते आणि घरांचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू केले आहे. कारण, हिवाळा सुरू होताच कामांत अडचणी जाणवतील. चिनी लष्कराने माघार घेतल्याचे आमच्या लक्षात आले आहे. भारतीय लष्कराची नियमित गस्त सुरू आहे.

मान-मेराकच्या सरपंच देचेन डोलकर म्हणाल्या की, आता सर्व सुरळीत सुरू आहे. हिवाळ्यात लोक पूर्वीप्रमाणे जनावरे फिंगर-फोरवर चारण्यासाठी घेऊन जाऊ शकतील असे वाटते. माजी कौन्सिलर आणि चुशुलच्या रहिवासी सोनम सेरिंग म्हणाल्या की, हिवाळा सुरू होताच चीन पुन्हा कारवाया सुरू करेल, अशी स्थानिक लोकांची पक्की धारणा आहे. तसे झाल्यास दोन्ही देशांत नव्याने चकमकी सुरू होऊ शकतात. पँगाँग सरोवराजवळ राहणारे तोशी मोतुप म्हणाले की, चिनी लष्कर फिंगर-फोरवर दाखल झाले होते तेव्हा आम्ही प्रचंड घाबरलो होतो. गलवानच्या घटनेनंतर सर्वत्र भीती आणि अस्वस्थता होती. पण आता सर्वकाही सुरळीत आहे. आम्ही आपापल्या कामांत व्यग्र आहोत.

गलवान घटनेनंतर २४५ कोटींचा निधी मंजूर

गलवान घटनेनंतर या गावाजवळ रस्ते आणि घरांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांनी १२९ कोटींचे चांगथांग पॅकेज जारी केले आहे. विशेष विकासासाठी अतिरिक्त ९१.९७ कोटींचा निधी बाजूला काढण्यात आला आहे. ‘बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम’साठी २३ कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. शुक्रवारी या भागासाठी एकूण २४५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

0