आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After The Objection Of The Health Minister, Ramdev Baba Withdrew His Statement On Allopathy

'यूटर्न-आसन':आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबांचा यू-टर्न; चौफेर टीकेनंतर आता म्हणाले- अ‍ॅलोपॅथीने अनेकांचा जीव वाचला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'तुमच्या वक्तव्यामुळे कोरोना योद्ध्यांचा अपमान झाला'

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आक्षेप घेतल्यानंतर योग गुरू रामदेवबाबा यांनी अ‍ॅलोपॅथीवरील आपले वक्तव्य मागे घेतले आहे. रामदेवबाबांनी अ‍ॅलोपॅथीथीला ‘मूर्खतापूर्ण विज्ञान’ असे म्हटले होते. यावर आक्षेप घेत हर्षवर्धन यांनी रविवारी दुपारी रामदेवबाबांना पत्र लिहिले. हर्षवर्धन यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘तुमच्या वक्तव्यामुळे कोरोना योद्ध्यांचा अपमान झाला आहे. देशाच्या भावना दुखावल्या आहेत. तुमच्या वक्तव्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कमी होऊ शकते. कोरोनाच्या विरोधातील आपली लढाई कमकुवत करू शकते. अ‍ॅलोपॅथिक औषधांनी कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले आहेत. अ‍ॅलोपॅथिक औषधांच्या सेवनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, असे म्हणणे अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्ही तुमचे वक्तव्य मागे घ्यावे.’

वक्तव्य मागे घेतल्यानंतर रामदेवबाबा म्हणाले-अ‍ॅलोपॅथीने अनेकांचे प्राण वाचवले : हर्षवर्धन यांच्या आक्षेपानंतर रात्री रामदेवबाबांनी आपले वक्तव्य मागे घेतले. ते म्हणाले,‘मी वैद्यकीयशास्त्राच्या प्रत्येक रूपाचा सन्मान करतो. अ‍ॅलोपॅथीने अनेकांचे प्राण वाचवले आहेत.’ तथापि, त्याआधी रामदेवबाबांच्या पतंजली योगपीठाने आयएमएच्या टिप्पण्या चुकीच्या असल्याचे म्हटले होते.

आयएमएने व्हिडिओच्या आधारे रामदेवबाबांवर केले होते आरोप : आयएमएने सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा हवाला देत शनिवारी रामदेवबाबांवर आरोप केले होते. आयएमएने म्हटले होते की,‘अ‍ॅलोपॅथी मूर्खतापूर्ण विज्ञान आहे, भारताच्या औषधी महानियंत्रकांकडून मंजुरी मिळालेली रेमडेसिविर, फेव्हिफ्लू आणि इतर औषधे कोरोनावरील उपचारांत अपयशी ठरली आहेत, अ‍ॅलोपॅथी औषधांच्या सेवनाने लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असा रामदेवबाबा यांचा दावा आहे.’

बातम्या आणखी आहेत...