आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केदारनाथ मंदिराची व्‍दारे उघडली:दोन वर्षांनंतर सामान्य भाविकांसाठी उघडली केदारनाथ मंदिराची द्वारे, सहा महिने दर्शनाची मुभा

केदारनाथ धाम15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडच्या केदारनाथ धामचे द्वार शुक्रवारी उघडण्यात आले. शुक्रवारी सकाळी ६.२५ वाजता वैदिक मंत्रोच्चारात बाबांची पंचमुखी मूर्ती मंदिरात विराजमान झाली. दार उघडताच संपूर्ण केदारनाथ धाम महादेवाच्या जयजयकाराने दुमदुमले. आता पुढील ६ महिन्यांपर्यंत भाविक बाबा केदारनाथाचे दर्शन घेऊ शकतील. यानिमित्त उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामीही येथे दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पहिली पूजा झाली. पहिल्या दिवशी जवळपास १० हजार भाविक केदारनाथ धाममध्ये आले. कोरोना महामारीमुळे २०२०-२१ मध्ये भाविकांना येण्यास परवानगी दिली नव्हती. यादरम्यान दार उघडले जात होते आणि भाविकांशिवाय बाबांची पूजा आणि आरती केली जात होती.

बातम्या आणखी आहेत...