आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Uttar Pradesh And Madhya Pradesh, Now Pass Bill Against Love Jihad In Gujarat Legislative Assembly, Convict Can Get Imprisonment For Up To 10 Years; News And Updates

गुजरातमध्ये लव्ह जिहाद बेकायदेशीर:यूपी आणि एमपीनंतर आता गुजरातमध्येही लव्ह जिहाद विरोधात विधेयक मंजूर; 10 वर्षे शिक्षेची तरतूद

गांधीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले

उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशानंतर गुजरात राज्यातही लव्ह जिहाद विरोधात विधेयक मंजूर झाले आहे. आता राज्यात लव्ह जिहाद बेकायदेशीर असणार आहे. गुजरात सरकारने विधानसभेत 'धर्म स्वातंत्र दुरुस्ती विधेयक - 2021' मंजूर केले. याअंतर्गत धमकी, लोभ आणि भीती दाखवून इतर धर्मातल्या मुलीशी जर लग्न किंवा धर्मांतर केले तर यासाठी पाच वर्षाची कैद आणि दोन लाख रुपये दंडाची तरतूद केली आहे.

या कायद्यातर्गंत एखाद्या अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती-जमातीच्या प्रकरणामध्ये सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच यामध्ये जर एखाद्या संस्थेने मदत केली तर त्याचे सरकारी अनुदान रद्द करुन त्यांनाही दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

सरकारने या प्रकरणास अजामीनपात्र गुन्हा मानला असून पोलिस उपअधिक्षक स्तरावरील व्यक्तीच या प्रकरणाची चौकशी करु शकेल. तसेच संबंधित प्रकरणामध्ये पीडितांच्या आई-वडील, भाऊ बहीण आण‍ि कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला पोलिसात जाऊन तक्रार दाखल करता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...