आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात जनगणनेची प्रक्रिया पुन्हा एकदा ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. देशभरात राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) अपडेट करण्याची प्रक्रिया १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत होणार होती, पण कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाकडून राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रशासकीय मर्यादा ३० जून २०२३ पर्यंत बंद केली जाईल. नियमांनुसार जिल्हा, उपजिल्हा, तालुका आणि पोलिस ठाणे आदी प्रशासकीय यंत्रणांच्या मर्यादा सील होण्याच्या तीन महिन्यांनंतर जनगणना होऊ शकते. आधी मर्यादा फ्रीज करण्याची तारीख ३१ डिसेंबर २०२० पर्यंत होती. आता प्रशासकीय यंत्रणांच्या मर्यादा १ जुलैपासून फ्रीज होतील. कोरोनापूर्वी १ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत प्रशासकीय मर्यादांवरील बंदी प्रभावी होती. उल्लेखनीय म्हणजे देशात प्रत्येकी १० वर्षात जनगणनेची तरतूद आहे. मागील जनगणना फेब्रुवारी-मार्च २०११ मध्ये झाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.