आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद दिनानिमित्त राजकीय नाट्य:एकता दिनाविरुद्ध आता निजामापासून मुक्तिदिनाची लढाई; टीआरएस-भाजप समोरासमोर

तेलंगण / एम. एस. शंकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये होणार असली तरी राजकारणाचा फड आताच तापला आहे. आता हैदराबाद विलीनीकरण दिनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने टीआरएस आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर (१७ सप्टेंबर १९४८) तेलंगण भारतात विलीन झाले. टीआरएस सरकारकडून हा दिवस ‘राष्ट्रीय एकता दिन’ (नॅशनल इंटिग्रेशन डे) म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रम तीनदिवसीय असतो. आता भाजप याला ‘विमोचन दिनम’ (लिबरेशन डे/मुक्ती दिवस) म्हणून साजरा करणार आहे. केंद्र सरकारकडून १७ सप्टेंबरला सिकंदराबाद परेड मैदानावर प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिनाप्रमाणे आयोजन केले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाहुणे असतील. तेलंगणामध्ये हा वाद प्रदीर्घ काळापासून सुरू आहे. हैदराबादचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान आपल्या संस्थानाचे विलीनीकरण पाकिस्तानात करू इच्छित होते, मात्र तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ‘ऑपरेशन पोलो’अंतर्गत त्यांना शरण येण्यास भाग पाडलेे. मुक्ती दिवस साजरा केल्याशिवाय तेलंगणाची इच्छा पूर्ण होणार नाही असे भाजपचे म्हणणे आहे. याच दिवशी त्यांना संस्थानिक निजामापासून मुक्ती मिळाली होती. हिंदूंच्या विरोधात निजामाने रझाकार मैदानात उतरवले होते, त्याची आठ‌वण भाजपला करून द्यायची आहे. एकता दिवस साजरा करणे ही धर्मनिरपेक्ष पक्षांची चाल आहे, असा भाजपचा आरोप आहे.

भाजपचा आरोप - टीआरएसला मतांची चिंता तेलंगण भाजपचे प्रवक्ते कृष्ण राव म्हणाले, आम्ही निवडणूक जाहीरनाम्यात हे आश्वासन दिले होते. २५-३० विधानसभा मतदारसंघांत मुस्लिम मते गमावण्याच्या भीतीने मुक्ती दिन साजरा करायला टीआरएस घाबरत आहे. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर टीआरएस राष्ट्रीय एकता दिनाचे भव्य आयोजन करत आहे. टीआरएसचे आमदार हनुमंत राव यांनी सांगितले की, आम्ही भाजपप्रमाणे प्रत्येक गोष्ट राजकीय फायद्यासाठी करत नाही. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने म्हटले आहे की, प्रत्येक निवडणुकीपूर्वी भाजप-टीआरएस अशा प्रकारची नौटंकी करत असतात.

बातम्या आणखी आहेत...