आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Against Rbi Sbi Pil Fille By Ashwini Upadhyay Delhi HC | Over Permitting Rs 2000 Note Exchange Without Id Proof

याचिका:विनाआयडी 2000 च्या नोटा बदलण्याची परवानगी का? RBI-SBI विरोधात भाजप नेत्याची दिल्ली हायकोर्टात धाव

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन हजार रुपयांच्या नोटा हळूहळू चलनातून बंद करण्याचे प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले आहे. या संदर्भात भाजप नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

या जनहित याचिकामध्ये म्हटले आहे की, कोणतीही स्लिप नाही, ओळखपत्र देखील नाही तरी देखील 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याचा आदेश हा अनियंत्रित, तर्कहीन आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 चे उल्लंघन करणारा आहे, अशी मागणी उपाध्याय यांनी याचिकेत केली आहे.

याचिकेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांना 2000 रुपयांच्या नोटा फक्त संबंधित बँक खात्यांमध्येच जमा करण्यात याव्यात, असे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे कोणीही इतर बँक खात्यात पैसे जमा करू शकणार नाही. याद्वारे काळा पैसा आणि बेहिशोबी मालमत्ता असलेल्या लोकांची सहज ओळख होईल. या उपायामुळे भ्रष्टाचार, बेनामी व्यवहार संपण्यास मदत होईल, असे याचिकेत म्हटले आहे.

याचिकाकर्ते उपाध्याय म्हणाले की, या निर्णयामुळे नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्राला काळा पैसा आणि बेशिस्त मालमत्ताधारकांविरुद्ध योग्य कारवाई करण्यात मदत होईल. त्यामुळे यासंदर्भात सरकार आणि आरबीआयला योग्य निर्देश देण्याची विनंती याचिकेत केली आहे.

उद्यापासून नोटा बदलण्याची प्रक्रिया
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने चलनातून बाहेर काढलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 23 मे 2023 मंगळवारपासून सुरू होणार आहे. कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही या उच्च नोटा सहजपणे बदलू शकता. यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म (रिक्विजिशन स्लिप) भरण्याची गरज नाही किंवा तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र मागवले जाणार नाही. तुम्ही एकावेळी 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलू शकता.

फॉर्म, आयडीविना नोटा बदलता येणार
नोटाबंदीच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये ओळखपत्र आवश्यक असेल, असे दावे सोशल मीडियावर केले जात होते. या अहवालांवर, देशातील सर्वात मोठी बँक SBI ने त्यांच्या सर्व शाखांना कळवले आहे की, RBI ने गेल्या शुक्रवारी तात्काळ प्रभावाने चलनातून काढलेल्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणत्याही फॉर्मची आणि कोणत्याही ओळखीच्या पुराव्याची आवश्यकता नाही. बँकेने 20 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकात प्रत्येकाला 2,000 रुपयांच्या इतर मूल्यांच्या नोटा बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे.

एकाच वेळी किती नोटा बदलता येतील ?
या वेळीही नोटा बदलण्याची प्रक्रिया नोव्हेंबर 2026 मध्ये पहिल्या नोटाबंदीच्या वेळी होती तशीच आहे. जेव्हा 500 आणि 1000 रुपयांच्या मोठ्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. म्हणजे आरबीआयने नोटा बदलण्याची मर्यादा निश्चित केली आहे. मध्यवर्ती बँकेच्या परिपत्रकानुसार, तुम्ही एकावेळी 2000 रुपयांच्या फक्त 10 नोटा बदलू शकाल. म्हणजेच एकाच वेळी नोटा बदलण्याची मर्यादा 20,000 रुपये ठेवण्यात आली आहे.

कोण आहे उपाध्याय ज्यांना सरन्यायधीशांनी देखील खडसावले होते

साधारण दोन महिन्यापूर्वी सीजेआय चंद्रचूड एका प्रकरणावर सुनावणी करत होते. यावेळी त्यांनी अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांना फटकारले होते. CJI DY चंद्रचूड यांनी अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांना सुनावले होते. कारण, जेव्हा उपाध्याय यांनी त्यांच्या सहकारी वकिलाला चुकीच्या पद्धतीने आवाज देऊन बोलावले. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, कोणताही वकील तुमचा सहकारी असला तरीही त्याचे नाव घेण्याची योग्य पद्धत असली पाहिजे.

म्हणाले होते- तुम्ही सुप्रीम कोर्टात उभे आहात
न्यायमूर्ती चंद्रचूड पुढे म्हणाले की, तुम्ही सर्वोच्च न्यायालयात उभे आहात. तुम्ही येथे वरिष्ठ वकील म्हणून खंडपीठासमोर बोलत आहात. सरन्यायाधीशांची वृत्ती पाहून कोर्टात काही काळ शांतता पसरली. त्यानंतर वकिल अश्विनी उपाध्याय यांनी आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आणि आपल्या सहकारी वकिलाचे नाव व्यवस्थित घेतले.

या बातम्या देखील वाचा

RBIची गाइडलाइन:4 महिन्यांनंतरही वैध राहतील 2000 रुपयांच्या नोटा, बँकांत गर्दी न करण्याचे गव्हर्नरचे आवाहन

मंगळवारपासून देशातील सर्व बँकांमध्ये 2000 च्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या घोषणेनंतर तीन दिवसांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, लोकांनी नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करू नये. आम्ही 4 महिन्यांची मुदत दिली आहे. नोट्स बदलण्यास शांततेत जा, परंतू वेळेचे गांभीर्य ठेवा. - येथे वाचा संपूर्ण बातमी

सावधान:2000 च्या 5 बनावट नोटा आढळल्यास होईल FIR, जाणून घ्या, नोटा बदलून घेण्यासाठी RBI चे दिशानिर्देश​​​​​​​​​​​​​​

​​​​​​​दोन हजारच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासंदर्भात आरबीआयने दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार जर ग्राहकांनी बँकेत बदलून घेण्यासाठी आणलेल्या नोटांमध्ये बनावट नोटा आढळल्यावर त्यांच्यावर फेक करन्सीचा शिक्का मारून त्या जप्त केल्या जातील. तसेच कायदेशीर कारवाईही केली जाईल. - येथे वाचा संपूर्ण बातमी

नको चिंता : 2000 च्या नोटा धारकांनी करू नये काळजी; कोणत्याही बँकेत जाऊन बदलता येतील नोटा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. मात्र, सध्याच्या नोटा अवैध ठरणार नाहीत. आरबीआयने सध्या 2000 च्या नोटा बँकांमध्ये बदलण्यास किंवा 30 सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा करण्यास सांगितले आहे. परंतु त्यानंतरही त्या कायदेशीर राहतील असेही सांगितले आहे. आता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत की या 2 हजाराच्या नोटा कशा बदलता येतील? - येथे वाचा संपूर्ण बातमी

नोटबंदीचा परिणाम काय? : NITI आयोगाचे माजी उपाध्यक्ष म्हणाले– 2000 रुपयांच्या नोटा बाद करून सरकारला अवैध पैसा रोखायचा​​​​​​​​​​​​​​

2,000 रुपयांची नोट चलनातून काढून घेतल्याचा अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होणार नाही, कारण परत आलेल्या नोटा लहान चलनाने बदलल्या जातील. अर्थशास्त्रज्ञ आणि नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी ही माहिती दिली आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी