आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Age 76, After Paralysis And Brain Haemorrhage, Infection Gripped, Oxygen Reached 64, Still Encouraged And Won The Battle

कोरोना वॉरियरची स्टोरी:वय 76 वर्षे, पॅरालिसिस आणि ब्रेन हॅमरेजनंतर झाले कोरोनाचे संक्रमण, ऑक्सिजन 64 पर्यंत पोहोचले; तरीही हिंमत न हारता जिंकली लढाई

भोपाळ ( प्रवीण पाण्डेय)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हमीदियाचे क्रिटिकल वार्डमध्ये शिफ्ट केल्यावर ऑक्सिजनची डिमांड 8 ली./ तास झाली आणि ऑक्सिजन लेव्हल 64 च्या खाली होती.

कोरोनाची दुसरी लाट प्रत्येक वयातील लोकांसाठी धोकादायक आहे, मात्र वयस्करांसाठी ही लाट जीवघेणी ठरते. अशा परिस्थितीत असे काही लोक आहेत, ज्यांचे वय जास्त आणि त्यांना विविध आजारांनी पहिलेच विळखा घातेलला आहे. असे असूनही त्यांनी कोरोनाशी दोन हात केल्याचेही पाहायला मिळत आहे.

असेच एक व्यक्ती 76 वर्षांचे जवाहर लाल दुबे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळच्या शास्त्री नगरमध्ये राहतात. ते पहिले स्पाइन, पॅरालिसिस आणि ब्रेन हॅमरेजच्या समस्येचा सामना करत होते. नुकतीच त्यांनी कोरोनावर मात केली आहे. जवाहर यांचा मुलगा सत्यार्थ यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनी कोरोनावर कधी मात केली...

ऑक्सिजन डिमांड 12 लीटर/तासांपर्यंत पोहोचली, मात्र 10 दिवसातच रुग्णालयातून परतले 1 एप्रिलला वडिलांना सर्दी-खोकला झाला. जे एक-दोन दिवसात बरेही झाले. 5 एप्रिलला दुपारी ते मार्केटसाठी निघाले. परतले तेव्हा त्यांची जीभ अडखळत होती. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेम हॅमरेज झाले होते, मला वाटले त्यामुळेच होत असेल. कारण तेव्हा त्यांच्या शरीराचा डावा भाग पॅरालाइज्ड झाला होता. तत्काळ त्यांना बंसल रुग्णालयात घेऊन गेलो आणि ब्रेन स्कॅन करुन घेतले तेव्हा सर्व नॉर्मल होते.

डॉक्टरांनी 6 एप्रिलला त्यांची कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. रुग्णालयात बेड रिकामा नव्हता. यामुळे मला त्यांना शिफ्ट करण्यास सांगितले. तेव्हाच हमीदियामध्ये बेड रिकामा असल्याची माहिती मिळाली. आम्ही हमीदिया येथे पोहोचलो तेव्हा त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले. त्यांना 5 ली./ तास ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.

हमीदियाचे क्रिटिकल वार्डमध्ये शिफ्ट केल्यावर ऑक्सिजनची डिमांड 8 ली./ तास झाली आणि ऑक्सिजन लेव्हल 64 च्या खाली होती. दुसऱ्या दिवशी ही मागणी 12ली./ तास झाली. 75 वर्षीय आई ज्यांना पॅरालिसिस आणि मोठा भाऊ त्यांना मेंटल इल्नेस आहे, या दोघांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. भावाला होम क्वारंटाइन आणि आईला हमीदियामध्ये दाखल करण्यात आले.

हळु-हळू वडील रिकव्हर होऊ लागले, मात्र 13 एप्रिलला आईचा मृत्यू झाला. मी त्यांना सांगितले नाही. वडील ज्या वार्डमध्ये होते, तिथून दोन बेड सोडून आई अॅडमिट होते. तरीही मी सांगितले नाही. 15 एप्रिलला वडिलांना सर्जिकल वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. रिपोर्टही निगेटिव्ह आला. मी डॉक्टरांना म्हटले की, मला त्यांना घरी न्यायचे आहे. डॉक्टरांनी म्हटले, घरात ऑक्सिजनची व्यवस्था कशी कराल, मी तत्काळ ऑक्सिजन कंसंट्रेटर खरेदी केले. आता त्यांची ऑक्सिजन लेव्हल 95-96 पर्यंत आली आहे. आणि ते पूर्णपणे स्वस्थ आहेत.

बातम्या आणखी आहेत...