आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निवाडा:एजंट घोटाळ्याची भरपाई पोस्ट कार्यालयानेच ग्राहकांना द्यावी

दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एजंटांनी केलेल्या घोटाळ्याची नुकसान भरपाई पोस्ट कार्यालयाने ग्राहकांना द्यावी. पश्चिम बंगालमध्ये एमआयएस खात्यात झालेल्या फसवणूक प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक आयोगाने हा निवाडा केला आहे. आयोगाचे पीठासीन अधिकारी सी. विश्वनाथ व सदस्य सुभाषचंद्र यांचे पीठ म्हणाले, एजंटांनी केलेल्या घोटाळ्याची विभागीय चौकशी सुरू असल्याची सबब सांगून ग्राहकांचे पैसे परत करण्यात विलंब करता येऊ शकत नाही. पोस्टाच्या विविध योजनांत गुंतवणूक करणारे लहान गुंतवणूकदार आहेत. ते अतिशय कठीण परिस्थिती पैसे गोळा करून पोस्टात जमा करतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. अशा प्रकरणात पोस्टाने आपल्या ग्राहकांचे पैसे व्याजासह त्यांना परत केले पाहिजेत.

बातम्या आणखी आहेत...