आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Aggression Against The Agriculture Bill; Farmers Across The Country Took To The Streets

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकार कधी ऐकणार..:कृषी विधेयकाच्या विराेधात आक्राेश; देशभरातील शेतकरी उतरले रस्त्यावर, पंजाब-हरियाणात 31 संघटनांचे आंदाेलन, बाजारपेठा बंद

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या विराेधात देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरल्या. शेतकरी संघटनांनी शुक्रवारी भारत बंदची हाक दिली हाेती. पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी त्याचे नेतृत्व केले. दाेन्ही राज्यांच्या ३१ संघटना आंदाेलनात उतरल्या. शेतकऱ्यांनी पंजाबच्या पतियाळा, लुधियानासह अनेक शहरांत दुकाने तसेच बाजारपेठा बंद केल्या. शिराेमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांनी केंद्राकडे कृषी उत्पादनासाठी ‘प्रिन्सिपल मार्केट यार्ड’ तयार करण्याची मागणी केली आहे. दिल्लीत उत्तर प्रदेश व हरियाणाहून आलेल्यांची तपासणी केली. उत्तर प्रदेश,हरियाणाच्या सीमेवरील भागात बॅरिकेड्स लावण्यात आले होते.

विरोधी : नवा कायदा शेतकऱ्यांना गुलाम करेल : राहुल गांधी
काँग्रेसने शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा दिला. पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी साेशल मीडियावर भूमिका मांडली. त्रुटीयुक्त जीएसटीने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याेगाला बरबाद केले. नवीन कृषी कायदा आपल्या शेतकऱ्यांना गुलाम करेल, अशी टीका राहुल यांनी केली. पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा म्हणाल्या, या कायद्यामुळे शेतकऱ्यांकडून हमीभाव हिसकावला जाईल. त्यांच्याकडून कंत्राटावर शेती करून घेतली जाईल. अशा शेतकऱ्यांना ना दाम ना सन्मान मिळेल. शेतकरी आपल्याच शेतात गुलाम हाेईल. भाजपचे हे कृषी विधेयक ईस्ट इंडिया कंपनीची आठवण करून देणारे आहे.

बिहार : पाटण्यात ‘भाजप-जाप’मध्ये जुंपली
बिहारच्या पाटण्यात राजद नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. पाटण्यात भाजप व पप्पू यादव यांच्या जन अधिकारी पार्टी (जाप) यांच्या कार्यकर्त्यांत संघर्ष झाला. दाेन्ही बाजूंनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण झाली. प्रदेश भाजप अध्यक्ष डाॅ. संजय जायसवाल यांनी जापच्या कार्यकर्त्यांवर भाजपच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप केला हाेता. त्यानंतर भांडणास सुरुवात झाली.

उत्तर प्रदेश : राज्यातील सर्व ७५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी निदर्शने केली. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस रोखली होती. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप सरकार देणगी देणाऱ्यांचे असल्याची टीका केली.

प. बंगाल : माकपच्या शेतकरी मोर्चाने तसेच इतर डाव्या पक्षांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांत सभा घेतल्या. अनेक ठिकाणी रास्तो रोकोही करण्यात आला.

दक्षिण भारत : शेतकऱ्यांनी कर्नाटक-तामिळनाडू महामार्गावर निदर्शने केली. चेन्नईत शेतकरी मानवी शिर घेऊन सहभागी झाले होते.

सरकार : विराेधकांचा शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळीबार
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कृषी विधेयकावरून हाेणाऱ्या विराेधाबाबत शुक्रवारी विराेधकांवर निशाणा साधला. भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने माेदींनी भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडिआे काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, अनेक दशके शेतकऱ्यांच्या नावाने केवळ घाेषणा देऊन खाेटी आश्वासने माथी मारण्यात आली. हे लाेक स्वार्थी आहेत. हे लाेक शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गाेळीबार करत आहेत.काही लाेकांनी शेतकरी, मजुरांच्या नावावर देशात तसेच राज्यात सरकारे बनवली. परंतु शेतकऱ्यांना तसेच मजुरांच्या पदरी कायद्याचे जटिल असे जाळे पडले.

बातम्या आणखी आहेत...