आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअग्निपथ योजनेसाठी अग्निवीरांच्या भरती संदर्भातली सर्व माहिती वायुसेनेने आपल्या संकेतस्थळावर जारी केली आहे. त्यानूसार, चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना वायुसेनेतर्फे अनेक सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. ज्या सोयीसुविधा वायुसेनेच्या जवानांना मिळतात त्याच सुविधा अग्निवीरांना दिल्या जाणार आहेत.
वायुसेनेच्या वेबसाईटवर जारी केलेल्या माहितीनूसार, अग्निवीरांना मासिक पगारासह कष्ट भत्ता, गणवेश भत्ता यासह कॅटिंग सुविधा आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळणार आहे. या सर्व सुविधा रेग्युलर सैनिकाला दिल्या जातात.
एक कोटी मिळणार
अग्निवीरांना सेवेदरम्यान प्रवासी भत्त्यासह 30 दिवसांची सुट्टी देखील मिळणार आहे. या व्यतिरिक्त त्यांना वैद्यकीय सुट्या देखील वेगळ्या असतील. यासोबतच सीएसडी कॅटिंगची सुविधा देखील मिळणार आहे. दुर्दैवाने जर सेवेदरम्यान एखादा अग्निवीरांला मरण आले तर त्याच्या कुटुंबियांना विम्याअंतर्गत एक कोटी रुपये दिले जातील.
कामगिरीच्या आधारे नियुक्ती
वायुसेनेने सांगितले आहे की, एअर फोर्स कायदा 1950 अंतर्गत ही भरती होत आहे. याचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल. वायुसेनेतील अग्निवीरांना वेगळी रँक असेल जी सध्याच्या रँकपेक्षा वेगळी असणार आहे. अग्निवीरांना या योजने संबधीच्या सर्व अटी आणि शर्ती मान्य कराव्या लागतील. या भरतीसाठी उमेदवाराचे वय जर 18 पेक्षा कमी असेल तर त्यांना नियुक्ती पत्रावर कुटुंबीयांची स्वाक्षरी लागणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर 25 टक्के अग्निवीरांना नियमित केडरमध्ये घेतले जाईल. 25 टक्के अग्निवीरांची नियुक्ती त्यांच्या सेवा कालावधीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल.
सेवा काळात मृत्यू झाल्यास...
अग्निवीरांना 4 वर्षांच्या सेवा कालावधीत 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. याशिवाय त्यांना 44 लाख रुपयांची एकरकमी रक्कमही दिली जाणार आहे. याशिवाय चार वर्षाच्या नोकरीत जेवढी सेवा शिल्लक राहिली असेल तो पगारही अग्निवीरच्या कुटुंबीयांना दिला जाणार आहे. याशिवाय अग्निवीरच्या सेवानिवृत्ती निधीमध्ये जमा झालेल्या रकमेवरील सरकारी योगदान आणि व्याजही अग्निवीरच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.