आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय लष्करातील अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहार तिसऱ्या दिवशीही निदर्शने सुरूच आहे. लखीसराय येथील विक्रमशिला एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत एका जाणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तो ट्रेनमध्ये उपस्थित असल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
राजधानी पाटणासह 25 जिल्ह्यांमध्ये भीषण दंगल उसळली आहे. आंदोलकांनी दानापूर आणि लखीसराय स्थानकांसह अर्धा डझनहून अधिक स्थानकांवर जाळपोळ केली असून, 10 रेल्वे गाड्या देखील पेटवल्या आहेत. लखीसराय येथील जनसेवा एक्स्प्रेसमध्ये झालेल्या जाळपोळीत एका 25 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ठिकठिकाणी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी लाठीचार्ज आणि गोळीबार केला.
बेतियामध्ये आंदोलकांनी उपमुख्यमंत्री रेणू देवी, भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या घरावर हल्ला केला. येथे भाजप आमदार विनय बिहारी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी सासाराम आणि मधेपुरा येथील भाजपच्या कार्यालयांना आग लावली. तर काल नवाडा येथील भाजपचे कार्यालय देखील जाळण्यात आले होते तर दोन आमदारांवर हल्ला करण्यात आला.
आज सकाळपासून आंदोलनकर्त्यांनी आठ रेल्वे गाड्यांना लक्ष्य केले. आंदोलकांनी समस्तीपूरमध्ये दोन, लखीसरायमध्ये दोन, दानापूर, फतुहा, आरा आणि सुपौलमध्ये प्रत्येकी एक पॅसेंजर ट्रेन पेटवून दिली. त्याचबरोबर बक्सर आणि नालंदासह अनेक जिल्ह्यांमध्ये रेल्वे रुळांवर जाळपोळ करण्यात आली आहे. अराह येथील बिहिया रेल्वे स्थानकावर आंदोलनकर्त्यांनी लुटमारही केली. तिकीट काउंटरमधून सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. बेतियामध्ये ट्रेनमधून उतरल्यानंतर प्रवाशांना मारहाण करण्यात आली.
इस्लामपूर रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी इस्लामपूर-हटिया एक्सप्रेस ट्रेन पेटवून दिली. एसी बोगीसह सुमारे 4 डबे जळून खाक झाले.
आंदोलकांनी सासाराम येथील टोल प्लाझाची तोडफोड केली. टोल प्लाझामध्ये जाळपोळही झाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. जाळपोळीनंतर आराहमधील रस्ता जाम झाला आहे.
वैशालीच्या हाजीपूर रेल्वे स्थानकावर संतप्त विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. समस्तीपूरमध्ये आंदोलकांनी बिहार संपर्क क्रांती, जम्मू तवी-गुवाहाटी एक्स्प्रेस जाळली. हाजीपूर-बरौनी रेल्वे सेक्शनच्या मोहिउद्दीननगर स्टेशनवरही जाळपोळ करण्यात आली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून आंदोलक ट्रॅकवर उभे आहेत. रेल्वेने सर्वत्र गाड्या थांबवल्या आहेत. अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत
समस्तीपूरमध्ये ट्रेन पेटवली
समस्तीपूरमध्ये आंदोलकांनी जम्मू तवी-गुवाहाटी एक्सप्रेस ट्रेन पेटवून दिली. यामध्ये रेल्वेच्या दोन बोगी उद्ध्वस्त झाल्या आहेत. पेटलेल्या बोगींमध्ये एसी कोचचा समावेश आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
नालंदामध्ये रेल्वे ट्रॅकला आग, महामार्ग ठप्प
नालंदामध्येही आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकला आग लावली. सैन्य भरतीच्या उमेदवारांनी राजगीर-बख्तियारपूर रेल्वे मार्गावरील पावपुरी फाटकावर ट्रॅक जाम केला. त्यामुळे NH-20 वरील वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
आरा मध्ये तोडफोड
आराच्या बिहियामध्ये आज पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे. तेथेही आंदोलकांनी तोडफोड केली आहे. त्याचवेळी मुंगेरमधील कृष्णा सेतू पुलावर अनेक तरुण जमा झाले असून, रास्ता रोको करून घोषणाबाजी देखील करत आहेत. त्यामुळे मुंगेर ते खगरिया बेगुसराय, भागलपूर आणि पाटणा या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
बेगुसरायमध्ये रेल्वे ट्रॅकवर जाळपोळ
बेगुसराय येथील लखमीनिया स्थानकावर तरुणांनी टायर जाळून रेल्वे ट्रॅकला आग लावण्याचा प्रयत्न केला. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील सुरूच आहे.
केवळ 4 वर्षांसाठी भरती करणे म्हणजे रोजगाराच्या हक्काचे उल्लंघन असल्याचे संतप्त तरुणांचे म्हणणे आहे. यावेळी आंदोलकांनी आमदार, खासदार यांच्यावर टीका करत म्हटले की, आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांचा मुलगा सैन्यात भरती होतो का, असा सवाल केला. लष्करात गरीब शेतकऱ्याचा मुलगाच जातो. सरकार या लोकांवर अन्याय करत आहे. ते सहन करणार नाही. केंद्रातील मोदी सरकार तरुणांच्या भविष्याशी खेळत आहे.
काल बिहारमध्ये एकूण 5 गाड्या जाळल्या
गुरुवारी 17 जिल्ह्यांमध्ये तरुण रस्ता आणि ट्रॅकवर उतरले. आंदोलकांनी छपरा, कैमूर आणि गोपालगंजमध्ये 5 गाड्या पेटवल्या तर 12 गाड्यांची तोडफोड केली. एकट्या छपरामध्ये 3 गाड्या पेटवण्यात आल्या. यादरम्यान प्रवाशांनी आपला जीव वाचवला.
अराहमध्ये पोलिसांना हल्लेखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. मोतिहारीमध्ये रेल्वेवरही दगडफेक करण्यात आली. आंदोलनामुळे सकाळी 6.25 नंतर रेल्वेसेवा ठप्प झाली. सुमारे नऊ तास गाड्या खोळंबल्या होत्या. दुपारी 3.30 नंतर सर्व मार्ग मोकळे करून गाड्या सुरू करण्यात आल्या. निदर्शनादरम्यान भाजपच्या 2 आमदारांवरही हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी छपरा सदर येथील भाजप आमदार डॉ. सीएन गुप्ता यांच्या घराची तोडफोड केली. तर वारिसलीगंजच्या आमदार अरुणा देवी यांच्यावरही हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी नवाडा येथील भाजप कार्यालयाला आग लावली. हाजीपूरमध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिस कर्मचाऱ्यांनी पळून आपला जीव वाचवला.
अग्निपथ: 4 वर्षांची भरती योजना
लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही शाखांमध्ये मोठ्या संख्येने तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने 14 जून रोजी अग्निपथ भरती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना संरक्षण दलात 4 वर्षे सेवा करावी लागणार आहे. पगार आणि पेन्शनचे बजेट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
चार वर्षांच्या नोकरीला विरोध
आंदोलक उमेदवार अंकित सिंह म्हणाले की, '2021 मध्ये सैन्यात नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. मुझफ्फरपूरसह आठ जिल्ह्यांतील हजारो उमेदवारांनी अर्ज केले होते. शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्यांपैकी त्यांची वैद्यकीय चाचणी होती. मेडिकल झाल्यानंतर आता एक वर्ष लेखी परीक्षेची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत परीक्षा घेण्यात आलेली नाही.
आंदोलक म्हणाले की, 'संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी घोषणा केली होती की अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची नियुक्ती केली जाईल, ज्यांना 4 वर्षांसाठी सैन्यात नोकरी दिली जाईल. 4 वर्षांनंतर 11 लाख रुपये भरून 75 टक्के जवान घरी परतणार आहेत. केवळ 25 टक्के सेवेत काही प्रमाणात विस्तार होणार आहे. या नव्या नियमाबाबत गदारोळ आणि निदर्शने सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.