आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालष्करात अल्पकालीन भरतीच्या “अग्निपथ’ योजनेला विरोध वाढत आहे. गुरुवारी हरियाणा, बिहारसह ७ राज्यांत तीव्र निदर्शने झाली. बिहारमध्ये तरुणांनी ५ रेल्वेंना आग लावली. भाजप कार्यालय आणि भाजप आमदारावरही हल्ला चढवला. वेगवेगळ्या राज्यांत ३४ रेल्वे रद्द कराव्या लागल्या.
हरियाणातील रोहतक येथे दोन वर्षांपासून सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या सचिन नावाच्या तरुणाने आत्महत्या केली. सचिन २२ वर्षांचा झाला होता. मात्र, त्याने आतापर्यंत लेखी परीक्षा दिली नव्हती. देशभरातील वाढते आंदोलन पाहता केंद्र सरकारने रात्री उशिरा उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा २१ वरून वाढून २३ वर्षे केली. ही सूट केवळ या वर्षासाठी राहील. कारण, गेल्या दोन वर्षांपासून लष्करात भरती होऊ शकली नाही आणि लाखो तरुणांनी २१ वर्षे वय ओलांडले आहे.
एनडीएमध्ये भाजपचा सहकारी पक्ष जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह म्हणाले की, या योजनेमुळे देशभरातील तरुणाईत असंतोष, निराशा आणि बेरोजगारीची भीती दिसत आहे. केंद्र सरकारने यावर फेरविचार करावा.
वयोमर्यादा वाढवली
सरकारने रात्री उशिरा उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा २१ वरून वाढून २३ वर्षे केली. ही सूट केवळ या वर्षासाठी राहील. कारण, गेल्या दोन वर्षांपासून लष्करात भरती होऊ शकली नाही आणि लाखो तरुणांनी २१ वर्षे वय ओलांडले आहे.
१००० जवानांच्या बटालियनमध्ये ७०० अग्निवीर
लष्करातील भरतीची अग्निपथ योजना वादात अडकली आहे. मात्र, आगामी वर्षांत सरकार या योजनेवर भर देईल. योजनेचा पूर्ण आराखडा समजावून सांगणाऱ्या अधिकाऱ्यांनुसार, अग्निवीर दरवर्षी निवडले जातील. त्यांची असेसमेंट प्रशिक्षणातून सुरू होईल. दरवर्षी मूल्यांकन होईल. चार वर्षांनंतर लष्करात पदोन्नतीसाठी नियमित चाचणी होईल, जशी ती आताही होते.
जे २५% अग्निवीर पदोन्नत होऊ शकतील ते लष्करात कायम राहतील. एका बटालियनमध्ये १००० जण असतात. यात १४ ते १८ अधिकारी असतात. अधिकाऱ्यांची भरती अग्निपथातून नव्हे तर नियमित परीक्षेच्या माध्यमातून होईल. बटालियनमध्ये ७०० शस्त्रसज्ज जवान असतात, त्यात वेगवेगळ्या रँकचे एनसीओ(नॉन कमिशन्ड ऑफिसर) असतात. उदा. सुभेदार, नायब सुभेदार आदी. मात्र, अग्निपथ योजनेद्वारे केवळ जवान निवडले जातील. चार वर्षांनंतर या जवानांतून २५ टक्क्यांना पदोन्नती मिळेल. ते पुढे चालून सुभेदार-नायब सुभेदाराच्या पदापर्यंत पोहोचतील. अशा स्थितीत ते अग्निवीर नव्हे तर नियमित जवान संबोधले जातील.
याशिवाय सुमारे २८० जवान क्लर्क, चालक, स्वयंपाकही आदी असतात. त्यांची नियुक्तीही अग्निपथ योजनेतूनच होईल. या हिशेबाने पाहिल्यास प्रत्येक बटालियनमध्ये आगामी काळात ७०० सैनिक अग्निपथ योजनेतून येतील. प्रत्येक रेजिमेंटला त्याच्या मापदंडानुसार जवान अग्निपथ योजनेअंतर्गत दिला जाईल.
सरकारने सांगितले फायदे
अग्निपथ योजनेवर सरकारने गुरुवारी वस्तुस्थिती सांगितली. त्यानुसार, ही अग्निपरीक्षा नव्हे तर संधी आहे. सरकारने योजनेतील प्रमुख फायदे विषद करत सांगितले की, सशस्त्र दलांत जाण्याच्या संधी वाढतील. आगामी वर्षांत अग्निवीरांची भरती तिप्पट होईल. सेवा पूर्ण झाल्यावर उद्योजक होण्यास इच्छूक जवानांना वित्तीय मदत मिळेल. निवृत्त अग्निवीरांना केंद्रीय दलांत आणि राज्य पोलिस भरतीत प्राधान्य दिले जाईल. अग्निवीर समाजासाठी धाेका बनण्याची शक्यता निराधार आहे.
देशभरात संताप
हरियाणा - माजी सैनिकाच्या मुलाची एजबार झाल्याने आत्महत्या यूपी - बुलंदशहर, उन्नाव, अलिगड, आग्रा, गाझीपुरात आंदोलन राजस्थान - सीकरमध्ये आंदोलन; २० जूनला दिल्ली मार्चची घोषणा बिहार - 3 शहरांत ५ रेल्वेंना आग, अनेक ठिकाणी रस्ते जाम उत्तराखंड - सीएमचा विधानसभा मतदारसंघ खटिमात बेरोजगार तरुणाचा मोर्चा हिमाचल - धर्मशालेत पीएम मोदींच्या रॅलित जाणाऱ्यांना रोखले मध्य प्रदेश - ग्वाल्हेरमध्ये टायर जाळून जाम; रेल्वे रोखण्याचा प्रयत्न
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.