आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने निवृत्त अग्निवीरांसाठी बीएसएफमध्ये 10% आरक्षण जाहीर केले आहे. यासोबतच कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे. अग्निवीर पहिल्या बॅचचा किंवा त्यानंतरच्या बॅचचा भाग आहे यावर ही सलवत अवलंबून असेल. एवढेच नाही तर या लोकांना शारीरिक चाचणीही द्यावी लागणार नाही. बीएसएफ जनरल ड्युटी कॅडर भर्ती नियम 2015 मध्ये सुधारणा केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
यापूर्वी केंद्राने आसाम रायफल्स आणि CAPF मध्ये अग्निवीरांसाठी आरक्षण जाहीर केले आहे. केंद्राने 6 मार्च रोजीच ही अधिसूचना जारी केली होती. यानुसार, कॉन्स्टेबल पदासाठी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत मिळेल, तर त्यानंतरच्या सर्व बॅचच्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट दिली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.