आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Agnivir; With Twice As Many Youths Arriving As In The Previous Recruitment, The Enthusiasm Extended The Duration Of The Process | Marathi News

काश्मिरात दहशतीला उत्तर- अग्निवीर:मागील भरतीपेक्षा दुप्पट संख्येने आले तरुण, उत्साहामुळे प्रक्रियेचा कालावधी वाढवला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा फणा ठेचला गेल्याने तेथील तरुण देशाच्या संरक्षणासाठी उत्साहाने समोर येत आहेत. केंद्रशासित प्रदेशात अग्निवीरांच्या भरतीसाठी सुरू असलेले भरती मेळावे हा याचा पुरावा आहे. राज्यातून या मेळाव्यांसाठी नोंदणी केलेल्यांची संख्या २५ हजारांवर गेली आहे. यंदा मागील भरतीच्या तुलनेत जवळपास दुप्पट तरुण आले आहेत. लष्कर भरतीची नवी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हा पहिला भरती मेळावा आहे, जेथे एकेकाळी दहशतवाद्यांचा बोलबाला होता अशा भागांतूनही तरुण आले. तरुणांचा उत्साह पाहून मेळावे २९ सप्टेंबरपर्यंत सुरू राहतील. एकट्या कुपवाडासाठी मेळावा ४ दिवस चालला. लष्कर भरती संघटनेने हैदरबेग, पाटण येथेही मेळावा घेतला. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात शेवटचा भरती मेळावा २०१९ मध्ये झाला होता. त्यानंतर कोरोनामुळे देशभरातील भरती थांबली होती. काही महिन्यांपूर्वी अग्निपथ योजना लागू करण्यात आली. त्याअंतर्गत ४० हजारपेक्षा जास्त अग्निवीरांची भरती केली जाईल.

खराब हवामान असूनही रोज आले २००० तरुण
कुपवाडा, बारामुल्ला, श्रीनगर, गंदेरबल, शोपियां, अनंतनाग, बडगाम, बांदीपुरा, लडाखच्या लेह आणि कारगिल जिल्ह्यांचे तरुणही सहभागी झाले.दररोज २००० तरुण आले. खराब हवामान असूनही भरती प्रक्रिया थांबली नाही.

बातम्या आणखी आहेत...