आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​अपघात:स्कूल बसची वाट पाहत असलेल्या 6 मुलांना कारने चिरडले, 2 जण ठार, 4 जणांची प्रकृती गंभीर

आग्रा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा येथे गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका भरधाव कारने 6 शाळकरी मुलांना चिरडले. या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला. तर 4 जण जखमी झाले आहेत. डौकी पोलिस स्टेशन हद्दीतील बांसमहापत गावात हा अपघात झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी फतेहाबाद-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोनल सुरू केले. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आठ वाजता मुले स्कूल बसची वाट पाहत होते. त्यानंतर भरधाव वेगाने जाणारी नेक्सॉन कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मुलांना चिरडले. यात सहा मुले गाडीखाली येतात.

रुग्णालयात उपचार
अपघातानंतर जखमींना शांती मांगलिक आणि एसआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अरविंद (12) आणि प्रज्ञा (9) या दोन मुलांना मृत घोषित करण्यात आले. एका मुलाची प्रकृती चिंताजनक असून तिघांची प्रकृती स्थिर आहे. सर्वांवर उपचार सुरू आहेत. सर्व मुले चुलत भाऊ आहेत. प्रीती, गुंजन, नमन आणि लावण्य या जखमी मुलांचा समावेश आहे..

चालक पकडला, तिघे फरार
घटनास्थळी उपस्थित असलेले कॅबिनेट मंत्री बेबी राणी मौर्य यांचे प्रतिनिधी यशपाल राणा म्हणाले, 'कारमध्ये चार जण होते. कार फतेहाबादहून येत होती. मुलांना चिरडल्यानंतर कार लोखंडी फलकावर आदळली. यानंतर कारमधील 3 जण पळून गेले. तर संतप्त लोकांनी चालकाला पकडले.

नागरिकांनी सांगितले की, 'ड्रायव्हर मद्यधुंद दिसत होता. त्याचे नाव आकाश असल्याचे समोर आले आहे. तो बाह येथील प्रतापपुरा येथील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले. कारमधील सर्व लोक बाहचे रहिवासी आहेत. ​​ते​ गाझियाबादला जात होते. फरार लोकांना घेऊन जाण्यासाठी लोक त्या ठिकाणी आले.

एसीपी फतेहाबाद सौरभ सिंह यांनी सांगितले की, 'मुले स्प्रिंग फील्ड स्कूलमध्ये शिकत असत. 2 मुलांचा मृत्यू झाला आहे. 4 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामस्थांची समजूत घालून जाम खुला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, यापूर्वी एसीपींनी 3 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती.