आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआग्र्याचा तरुण अभियंता दीपक मखीजा नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या 4 मित्रांसोबत पुद्दुचेरीला गेला होता. तिथे समुद्रात पोहताना तो बुडाला. तो बुडत असताना त्याचे मित्र व्हिडिओ तयार करत होते. काही तासांनी त्याचा मृतदेह आढळला. मित्रांनी दीपकच्या कुटुंबीय व पोलिसांना या दुर्घटनेची माहिती दिली. कुटुंबीय लगेचच पुद्दुचेरीसाठी रवाना झाले आहे.
या घटनेचा एक व्हिडिओही उजेडात आला आहे. त्यात 3 तरुण समुद्रात पोहताना दिसून येत आहेत. तर अन्य एक युवक व्हिडिओ तयार करताना दिसून येत आहे. तेव्हा एक मित्र अचानक समुद्रात बुडाला. व्हिडिओ तयार करणाऱ्याला तो नाटक करत असल्याचे वाटले. पण त्यानंतर त्याला वस्तुस्थिती कळाली. त्यानंतर तो अरे तो गेला... शिट. येथे कुणीही नाही. तो आत गेला. तो मेला, असे म्हणताना ऐकू येत आहे.
बंगळुरुत वर्षभरापासून नोकरी करत होता दीपक
दीपक आग्रा येथील विकास कॉलनीत राहत होता. तो मागील वर्षभरापासून बंगळुरुत नोकरी करत होता. पोलिसांना त्याच्या एका मित्राने सांगितले की, सर्वचजण नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी 31 डिसेंबर रोजी सकाळी पद्दुचेरीला गेले होते. सायंकाळी समुद्र किनारी मस्ती करताना दीपक पोहण्यासाठी समुद्रात गेला.
पाहता पाहता दीपक समुद्रात बुडाला
मित्राने सांगितले की, अचानक वेगवान लाटा उसळल्या. त्यामुळे दीपकला स्वतःला सांभाळण्याची संधी मिळाली नाही. तो लाटांत सापडला आणि काही क्षणांतच समुद्रात बुडाला. प्रथम तो थट्टा करत असल्याचे वाटले. पण तो बुडाल्यानंतर आम्ही मदत मागितली. आम्ही हतबल उभे होतो. आम्हाला काहीच करता आले नाही.
अखेरच्या वेळी केली होती आईशी चर्चा
दीपकच्या कुटुंबाचे आग्र्याच्या राजा मंडी स्टेशनलगत कृष्णा हॉटेल आहे. दीपक शिक्षणात हुशार होता. वर्षभरापूर्वीच तो नोकरीवर लागला होता. त्याला वेतनही चांगले होते. दीपकने आईशी फोन करून तो आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरू पद्दुचेरीला आल्याचे सांगितले होते. नववर्षा आनंद साजरा करण्यासाठी मी नंतर आग्र्यालाही येईल. सकाळीच त्याच्याशी बोलणे झाले होते. सायंकाळी तो समुद्रात बुडाल्याची बातमी आली. त्याच्या आईला त्याच्या मृत्यूची बातमी अजून देण्यात आली नाही.
3 भावांत दीपक सर्वात मोठा
दीपकचे चुलते नानक राम यांनी सांगितले की, दीपक 3 भावांत सर्वात मोठा होता. तो 22 वर्षांचा होता. दीपकचे वडील तुलसी राम व अन्य कुटुंबीय पद्दुचेरीला पोहोचलेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. ते सोमवारी आग्र्याला आणले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.