आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मंगळवारी (22 डिसेंबर) यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. एका वेगवान कार टँकरला धडकली. ही टक्कर इतकी वेगवान होती की टँकरच्या तेलाची टँक फुटली आणि कारला आग लागली. कारमधील 5 जण होरपळले. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एक मूल, एक महिला आणि तीन तरुणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्याप कोणाची ओळख पटली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना पीडितांच्या कुटूंबाची सर्वतोपरी मदत करण्याची सूचना केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौच्या क्रमांक (UP -32 KW 6788) कारमधून 5 जण दिल्लीकडे जात होते. सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास यमुना एक्स्प्रेस वेवरील खंदौली परिसरातील टोल प्लाझाच्या जवळपास 4 किमी अंतरावर झरना नाल्याजवळ कार पोहोचली होती. तेव्हा अचानक एका टँकरने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. गाडीही वेगात होती. ती अनियंत्रितपणे टँकरच्या डिझेल टँकवर आदळली. यानंतर गाडीला प्रचंड आग लागली. लखनौच्या राजकुमारच्या नावावर कारची नोंद आहे. सर्व मृतक उन्नाव येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
अग्निशमन दल एक तास उशीरा आले
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आसपासच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत टँकरचा चालक व क्लिनर फरार झाला होता. कारला पूर्णपणे आग लागली होती. त्यामध्ये बसलेले लोक मदतीची याचना करीत होते, परंतु सुमारे एक तासानंतर अग्निशमन दलाची गाडी आली. तोपर्यंत कार व त्यामधील प्रवासी जळून खाक झाले. अपघातानंतर सुमारे एक तासासाठी एक्स्प्रेस वेवर वाहतूक थांबली.
DM-SSP यांनी घटनेची माहिती घेतली
ही घटना समजताच आग्राचे DM प्रभू एन सिंग आणि SSP बबलू कुमार घटनास्थळी दाखल झाले. सीओ अर्चना सिंह यांच्या म्हणण्यानुसार टँकरची इंधन टाकी फुटल्याने कारला आग लागली. मृतांची ओळख पटली जाऊ शकली नाही. कारच्या नंबरच्या आधारे, त्याच्या मालकाकडून माहिती घेतली जात आहे.
एका आठवड्यापूर्वीही घटना घडली
16 डिसेंबर रोजी संभळ जिल्ह्यात भरधाव वेगात रोडवेज बस आणि टँकरची भीषण टक्कर झाली. यात बसमधील 8 जण ठार झाले. दाट धुक्यामुळे हा अपघात झाला होता. उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली मणिपूर गावाजवळ उभी असल्याचे सांगण्यात आले होते. टँकरने धडक दिली तेव्हा बस पलटी झाली. बसमध्ये सुमारे 45 लोक होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.