आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Agriculture Engineering Student Dies In Punjab While Running Behind Train, Body Will Be Flown By Plane As Soon As District Collector

मृत्यू:कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा रेल्वेमागे धावताना पंजाबात मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेने विमानातून येणार मृतदेह

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पंजाबाच्या हिसारमध्ये गेला असताना परतीच्या प्रवासात रेल्वेसाठी धावताना चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अविनाश अनिल बेदरे (रा. कोरडेवाडी, ता. केज) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी शर्मा यांनी तत्परता दाखवत पंजाब प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर मंगळवारी विमानाने मृतदेह आणला जाणार आहे. केज तालुक्यातील कोरड्याची वाडी येथील रहिवासी असलेला अविनाश अनिल बेदरे हा बीडच्या आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात कृषी अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत हाेता. पंजाबाच्या हिसारमध्ये असलेल्या नॉर्दर्न रिजन फार्म मशिनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूमध्ये तो प्रशिक्षणासाठी २८ नोव्हेंबर रोजी गेला असता ही घटना घडली.

कलेक्टरांनी भरले विमान तिकीटाचे पैसे दरम्यान, रेल्वेने अनिवाशचा मृतदेह आणण्यासाठी ३ दिवसांचा वेळ लागणार होता. ही बाब जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना सीएस डॉ. सुरेश साबळेंमार्फत कळल्यानंतर त्यांनी पंजाब प्रशासनाशी व रेल्वे पोलिसांशी संपर्क केला. स्वत: विमानाचे पैसे भरुन विमानाने अविनाशचा मृतदेह औरंगाबादला आणण्याची व्यवस्था केली.

बातम्या आणखी आहेत...