आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Agriculture Minister Tomar Introduced 2 Bills Related To Farming In Rajya Sabha, Said These Will Change The Lives Of Farmers, They Have No Relation With MSP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाळी अधिवेशनाचा 7वा दिवस:राज्यसभेत शेतीसंबंधीत 2 विधेयक सादर, मंत्री तोमर म्हणाले - यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य बदलेल, काँग्रेसने म्हटले - शेतकऱ्यांच्या डेथ वॉरंटवर सही करणार नाही

8 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कोरोनामुळे सदनाच्या कार्यवाहीमध्ये 10 खासदार होत नाहीये सहभागी
 • काँग्रेससह अनेक विरोधीपक्ष कृषी सुधारणा विधेयकाचा विरोध करत आहेत

कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी रविवारी राज्यसभेत दोन शेतकरी आणि उत्पादन व्यापार व वाणिज्य (पदोन्नती आणि सुलभता) विधेयक आणि शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) करारनामा सादर केला. ते म्हणाले की, दोन्ही बिले ऐतिहासिक आहेत, ते शेतकर्‍यांचे जीवन बदलतील. शेतकरी देशभर कुठेही धान्य विकू शकतील. मी त्यांना विश्वास देतो की, बिलांचा संबंध किमान समर्थन किंमत (एमएसपी)शी नाही.

दुसरीकडे कॉंग्रेसने याचा कडाडून विरोध करण्यास सुरवात केली आहे. कॉंग्रेसचे खासदार प्रतापसिंह बाजवा म्हणाले की, ते आणि त्यांचा पक्ष शेतकऱ्यांच्या मृत्यू वॉरंटवर सही करणार नाहीत. पंजाब-हरियाणा येथील शेतकरी विधेयकाचा निषेध करत आहेत. एवढेच नव्हे तर शिरोमणी अकाली दलाच्या मंत्री हरसिमरत कौर यांनी या विषयावर मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.

केजरीवाल म्हणाले - सर्व मिळून बिलाचा विरोध करु
आम आदमी पार्टीनेही शेतकऱ्यांसंबंधीत बिलाचा विरोध केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत सर्व विरोधी पक्षांना या बिलाच्या विरोधात वोटिंग करण्यास सांगितले आहे.

आरजेडीचे खासदार प्रो. मनोज कुमार झा म्हणाले 'पंतप्रधान म्हणतात की, शेतकरी बिलावर काही लोक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. तर सत्य हे आहे की, हे सर्व तुम्हीच करत आहात. विधेयकात अनेक गोष्टी स्पष्ट नाही. हे शेतकरी विरोधी बिल आहे.'

विधानभवनात सदस्यांच्या आकड्यांचा गणित?

 • 245 सदस्यांच्या राज्यसभेत दोन सीट रिक्त आहेत. अशा प्रकारे आता एकूण सदस्यांची संख्या 243 आहे.
 • सरकारला बिल पास करण्यासाठी 122 सदस्यांची साथ असावी लागणार आहे.
 • 10 सदस्य कोरोनामुळे सदनाच्या कार्यवाहीत सहभाग घेणार नाहीत.
 • सध्या भाजपचे 86 खासदार आणि त्यांच्या सहयोगी दलाचे (अकाली दल सोडून) सदस्य मिळून ते 105 होतात.
 • बिल पास करुन घेण्यासाठी सरकारला विरोधी पक्षाच्या 17 सदस्यांची साथ हवी.
 • 9 सदस्यांच्या अन्नाद्रमुकने विधेयकाला समर्थन दिले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलनीस्वामी यांनी तिन्ही कृषी विधेयकांना समर्थन करणार असल्याचे सांगितले आहे. अशा प्रकारे बिलाच्या समर्थनात 114 खासदार होतात.
 • शिवसेनेनेही बिलाचे समर्थन केले आहे. सदरनात शिवसेनेचे तीन सदस्य आहेत. अशावेळी बिलच्या समर्थनात 117 जण आहेत.
 • आता सरकारला पाच सदस्यांची गरज लागणार आहे. अशावेळी बीजेडीचे 9, वायएसआर काँग्रेसचे 6, टीआरएसचे 7, आणि टीडीपीच्या 1 सदस्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पक्षांच्या एकूण सदस्यांची संख्या 23 आहे.
बातम्या आणखी आहेत...