आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ahmedabad Delhi Will Have Herd Immunity In 4 6 Months, But In Rural Areas It Will Take A Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आराेग्य:अहमदाबाद-दिल्लीत 4-6 महिन्यांत हर्ड इम्युनिटी, ग्रामीण भागात मात्र लागेल एक वर्ष

नवी दिल्ली | पवन कुमारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरी भागात अधिक संसर्ग असल्याने हर्ड इम्युनिटी लवकर येईल

सरकारच्या एका समितीने गणितीय प्रारूपाच्या माध्यमातून देशात ३० टक्के लाेकसंख्येला काेराेनाची लागण झाली असल्याचे गेल्या महिन्यात म्हटले हाेते. फेब्रुवारीत हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत जाईल. त्यानंतर हर्ड इम्युनिटीसारखी स्थिती हाेईल. परंतु सार्वजनिक आराेग्य तज्ञांचे याबद्दल वेगळे मत आहे. नॅशनल काेविड टास्क फाेर्सचे सदस्य प्रा. डीसीएस रेड्डी म्हणाले, अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, सुरत, कोलकातासारख्या उच्च घनतेच्या शहरांमध्ये पुढील ४ ते ६ महिन्यांत ४०-५०% लाेकांना याची लागण झालेली असेल. अशा स्थितीत येथील लाेेक हर्ड इम्युनिटीच्या पातळीपर्यंत पाेहोचू शकतात. पण गावात हर्ड इम्युनिटी येण्यास एक वर्ष लागू शकते. तेथे संसर्गाचे प्रमाणही कमी आहे. नॅशनल काेविड टास्क फाेर्सचे सदस्य प्रा.के. श्रीनाथ रेड्डी यांच्या मते किती टक्के लाेकसंख्या संक्रमित झाली तर हर्ड इम्युनिटी म्हणता येईल हे स्पष्ट सांगता येणार नाही. हे प्रमाण ४० ते ८० % पर्यंत असू शकते. जागतिक आराेग्य संघटनेनेही सध्या काेणत्याही देशात हर्ड इम्युनिटीसारख्या स्थितीची घाेषणा केलेली नाही. प्रा.रेड्ड‌ींच्या मते हर्ड इम्युनिटी आल्यावरही धाेका कायम राहू शकताे. त्यांच्या मते एखाद्या शहराच्या ६० टक्के लोकसंख्येला लागण झाली असेल व तेथील ४० टक्के लाेकसंख्या धाेक्यापासून वाचू शकते. पण ताे त्याच्या कक्षेत राहिला तरच हे शक्य आहे. पण ताे त्याच्या कक्षातून वा शहराच्या बाहेर पडून फक्त १० ते १५ % लाेकसंख्येच्या शहरात गेला तर त्या शहरातील लाेकांना तितकाच धाेका असेल. दिल्लीत एम्समधील प्रा. संजय रॉय म्हणाले, लस आल्यानंतर संसर्ग लवकर थांबेल, पण लस येण्यास विलंब झाला तर ताे अनेक वर्ष सुरू राहील. लस आल्यावर त्याचा परिणाम किती काळ राहील यावर बरेच काही अवलंबून आहे. चाचणी अभ्यासाच्या वेळी लसीमध्ये जितकी एफिकेसी राहील ती सामूहिक स्तरावर लस देताना त्यापेक्षा त्यात कमी एफिकेसी असेल हे निश्चित आहे.

यात मृत्यूचा धाेका आहे किंवा नाही...
अमेरिकेत ग्रेट बॅरिंग्टनची घोषणा झाली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे कमी जाेखीम असलेल्यांनी कोरोनाची भीती बाळगू नये व सामान्य जीवन जगावेे. यामुळे हर्ड इम्युनिटी लवकर येईल. पण निराेगी व्यक्तीला संसर्ग झाल्यास धाेका आहे की नाही हा प्रश्न आहे. प्रसिद्ध जामा कार्डिआॅलाॅजीने १०० बरे झालेल्या रुग्णांवर अभ्यास केला. यात ७८ लाेकांत फुप्फुसे-हृदयाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. भविष्यात बऱ्या झालेल्या रुग्णांमुळे इतरांना नुकसान हाेणार का, हे सांगता येणार नाही.

काही वैज्ञानिक अभ्यास झाला आहे का ?
ब्राझीलच्या मॅनॉस शहरात रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ हाेेऊन अचानक ती संख्या कमी झाली. ६६% लाेकसंख्येला संसर्ग झाला व नंतर लाेकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचे एका अभ्यासात म्हटले आहे. परंतु याचा आढावा घेतलेला नसल्याचे जागतिक आराेग्य संघटनेने म्हटले आहे.

हर्ड इम्युनिटीची वेळ आली आहे का ?
जगातील कोणत्याही देशात हर्ड इम्युनिटी सध्या आलेली नाही. जगातील सुमारे ७० लोकसंख्या संक्रमित झाल्यावर हर्ड इम्युनिटीसारखी स्थिती निर्माण हाेईल, असे महामारीच्या प्रारंभी म्हणण्यात येत हाेते. परंतु आता जगभरातील शास्त्रज्ञ असे म्हणत आहेत की ५० टक्के लोक संक्रमित झाल्यावरही हर्ड इम्युनिटी येऊ शकते.

हर्ड इम्युनिटीदेखील पूर्णत: सुरक्षित नाही
हर्ड इम्युनिटी म्हणजे काय :
हर्ड इम्युनिटी अशा स्थितीला म्हणतात की, तेथे राहणारे लाेक नैसर्गिकरीत्या व्हायरसने संक्रमित हाेऊन इम्युनिटी प्राप्त करू शकतात वा एखाद्या लसीद्वारे राेगप्रतिकारक क्षमता मिळते. यामध्ये लोकसंख्येचा एक मोठा भाग संक्रमित हाेऊन विषाणूचा प्रसार हळूहळू कमी होतो.