आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबादमध्ये हिट अँड रन:कार रेस करत असलेल्या मुलांनी फुटपाथवर झोपलेल्या मजुराच्या कुटुंबाला चिरडले; महिलेचा मृत्यू, नवरा आणि तीन मुलांची प्रकृती गंभीर

अहमदाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबादमधील शिवरंजनी चौकाजवळ सोमवारी रात्री उशिरा फूटपाथवर झोपलेल्या एका मजुराच्या कुटुंबाला कारने धडक दिली. यामध्ये पती-पत्नी आणि त्यांची तीन मुले यांचा समावेश आहे. महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुले व त्यांच्या वडिलांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर कारमधील चार तरुण घटनास्थळावरून पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे.

दोन कार दरम्यान रेस चालू होती
दोन कारमध्ये रेस चालू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ओव्हरटेक करत असताना दुसरी कार फुटपाथवर चढल आणि फुटपाथवर झोपलेले कुटुंब कारखाली आले. कारमध्ये चार तरुण होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे चौघेही पळून जाताना दिसत आहेत.

कार मालकाला ताब्यात घेतले आहे
घटनेची माहिती मिळताच पोलिस व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील कार शैलेश शाह नावाच्या व्यक्तीची आहे. मात्र, घटनेच्या वेळी तो कारमध्ये होता की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. त्याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी केली जात आहे. जखमींची नावे बाबूभाई (वडील) तर मुलांची नावे जेतन, सुरेखा आणि विक्रम अशी आहेत.

बातम्या आणखी आहेत...