आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ahmedabad Lizard Found In McDonald's Cold Drink | Municipal Corporation Sealed The Restaurant | Marathi News

मॅकडोनाल्डच्या कोल्ड्रिंकमध्ये निघाली मृत पाल:मॅनेजर म्हणाला- असे घडतच राहते, महापालिकेने आउटलेट केले सील

अहमदाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील प्रसिद्ध फूड रेस्तरॉं मॅकडोनाल्डमधून असे एक प्रकरण समोर आले आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अहमदाबादमधील सायन्स सिटी रोडवर असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये ग्राहकांच्या कोल्ड ड्रिंकमध्ये पाल आढळून आली. ही घटना मागील शनिवारी (21 मे)ची आहे. भार्गव जोशी आणि मेहुल हिंगू या दोन मित्रांनी दोन आलू टिक्कीसह दोन कोक ऑर्डर केल्या होत्या.

भार्गव सांगतात की, त्यांनी कोकमधील स्ट्रॉ हलवताच आतून एक मेलेली पाल वर आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आउटलेटने दिलेल्या कोल्ड्रिंकमध्ये पाल स्पष्टपणे दिसत आहे.

महापालिकेने आऊटलेट केले सील
या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला. कोल्ड्रिंक पीत असलेल्या ग्राहकाने महापालिकेकडे तक्रार केली. माहिती मिळताच पालिकेचे अधिकारी तेथे आले. महापालिकेच्या आरोग्य व अन्न विभागाने शीतपेयांचे नमुने घेऊन ते सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. कारवाई करत पालिका अधिकाऱ्यांनी हे रेस्तरॉं सील केले आहे.

रेस्तरॉंचा मॅनेजर म्हणाला - असे होतच राहते
भार्गव यांनी सांगितले की, ही घटना घडली त्यावेळी मॅनेजर उपस्थित नव्हते. घटनेनंतर काही तासांनी एरिया मॅनेजर तेथे आले. भार्गवने मॅनेजरला घटनेची माहिती दिली तेव्हा तो हसू लागला. मॅनेजर हसत हसत म्हणाला की असे बरेचदा घडते. भार्गवने आरोप केला की, तो आणि त्याचे मित्र त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी रेस्तरॉंमध्ये 4 तासांपेक्षा जास्त वेळ बसले, परंतु मॅनेजरने त्यांना सांगितले की ते फक्त त्यांचे पैसे परत करू शकतात.

भार्गवच्या म्हणण्यानुसार, रेस्तरॉंचे कर्मचारी आणि मॅनेजरचे वागणे खूपच आश्चर्यकारक होते. हे पैसे घ्यायचे असतील घ्या नाही तर निघून जाऊ शकता, असे मॅनेजरने सांगितले. एरिया मॅनेजरने पोलिसांना बोलावण्याची धमकीही दिली.

बातम्या आणखी आहेत...