आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात सगळ्यात सुंदर ठरले भारतीय:AI ने निवडल्या सर्वात आकर्षक व्यक्ती; अमेरिका, ब्रिटनलाही टाकले मागे

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर मोईच्या विश्लेषणात सर्वाधिक आकर्षक व्यक्तींमध्ये भारतीय महिला आणि पुरुषांचा समावेश करण्यात आला आहे. - Divya Marathi
पोर मोईच्या विश्लेषणात सर्वाधिक आकर्षक व्यक्तींमध्ये भारतीय महिला आणि पुरुषांचा समावेश करण्यात आला आहे.

सौंदर्याच्या बाबतीत भारताने अमेरिकेसह जगभरातील देशांना मागे टाकले आहे. नुकतीच 50 आकर्षक दिसणाऱ्या देशांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका दुसऱ्या, तर ब्रिटन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पोर मोई या प्रसिद्ध स्विम वेअर ब्रँडने ही स्टडी केला आहे. या अहवालानुसार जपान चौथ्या स्थानावर, तर कॅनडा पाचव्या स्थानावर आहे.

कसे ठरवले सौंदर्याचे निकष?

इंग्लंड स्थित द सनच्या वृत्तानुसार, सर्वात आकर्षक व्यक्तिमत्त्वे निवडण्यासाठी सोशल मीडिया न्यूज एग्रीगेटर प्लॅटफॉर्म Reddit वर दिसणार्‍या पोस्टचे विश्लेषण करण्यात आले. ज्यामध्ये विविध देशांतील लोक होते. या पोस्टवरील कमेंटमध्ये येणाऱ्या आकर्षक, सुंदर, देखणा, भव्य, गुड, हॉट आणि सेक्सी अशा शब्दांच्या आधारे त्यांचा स्कोअर तयार करण्यात आला. याशिवाय त्यांना मिळालेल्या अपव्होट्सचाही एक भाग बनवण्यात आला. आणि मग एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन मानांकन तयार करण्यात आले.

पोर मोईच्या विश्लेषणात सर्वाधिक सुंदर अमेरिकी महिला आणि पुरुषाचे रूप असे आहे.
पोर मोईच्या विश्लेषणात सर्वाधिक सुंदर अमेरिकी महिला आणि पुरुषाचे रूप असे आहे.

याच वृत्तानुसार, सुंदर दिसण्याच्या बाबतीत एकूण देशांच्या यादीत ब्रिटन पहिल्या 10 मध्येही स्थान मिळवू शकले नाही. तथापि, ब्रिटनचे पुरुष खूपच आकर्षक मानले गेले आहेत आणि पुरुषांच्या यादीत ब्रिटनला पहिल्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.

पुरुषांच्या यादीत भारत दुसऱ्या, इटली तिसऱ्या, अमेरिका चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार अमेरिकेपाठोपाठ स्वीडन, जपान, फ्रान्स, आयर्लंड, बेल्जियम आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो.

या स्टडीमध्ये देशाव्यतिरिक्त सुंदर महिला आणि देखण्या पुरुषांचीही स्वतंत्र यादी जाहीर करण्यात आली आहे. यातही भारत आघाडीवर राहिला. या यादीत भारतीय महिलांचे वर्णन जगातील सर्वात सुंदर म्हणून करण्यात आले आहे.

एआयच्या मते सर्वात आकर्षक स्वीडिश स्त्री आणि पुरुष असे आहेत.
एआयच्या मते सर्वात आकर्षक स्वीडिश स्त्री आणि पुरुष असे आहेत.

जगातील सर्वात सुंदर महिलांच्या बाबतीत जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामध्ये स्वीडन तिसऱ्या, पोलंड चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, इटलीच्या महिला पाचव्या क्रमांकावर आहेत. विविध देशांचे सौंदर्य दाखवण्यासाठी एआयचा वापर करण्यात आला आणि यातून त्यांची चित्रे प्रसिद्ध झाली.

एआयच्या मते सुंदर ब्रिटिश असे दिसतात. या यादीत ब्रिटिश 12व्या क्रमांकावर आले आहेत.
एआयच्या मते सुंदर ब्रिटिश असे दिसतात. या यादीत ब्रिटिश 12व्या क्रमांकावर आले आहेत.

Pour Moi च्या मते, जेव्हा जेव्हा जगातील सर्वात सुंदर महिलेचे नाव येते तेव्हा Reddit वापरकर्त्यांच्या यादीत भारतीय महिला पहिल्या स्थानावर असतात. चित्रपटांपासून ते जगाच्या अनेक टप्प्यांवर भारतीय महिलांनी आपल्या सौंदर्याचा बोलबाला केला आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मते, सर्वाधिक सुंदर जपानी असे दिसतात.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मते, सर्वाधिक सुंदर जपानी असे दिसतात.

अहवालानुसार, जपान आणि स्वीडनमधील महिलांचा टॉप 3 मध्ये समावेश आहे. दोन्ही देशांतील महिला त्यांच्या खास लूकसाठी ओळखल्या जातात. जपानी महिला त्यांच्या स्वच्छ लूक आणि वेगळ्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जातात. दुसरीकडे, स्वीडिश महिलांना कमी अॅक्सेसरीजसह चांगले दिसण्यासाठी ओळखले गेले आहे.

सर्वाधिक सुंदर कॅनडियन स्त्री-पुरुषांची प्रतिमा.
सर्वाधिक सुंदर कॅनडियन स्त्री-पुरुषांची प्रतिमा.

जगभरात भारतीयांच्या वाढत्या वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर, हा अहवाल त्यांच्या ताकदीचे उदाहरण सादर करतो आणि दर्शवतो की भारतीय जगभर पसरत आहेत आणि त्यांचा नावलौकिक करत आहेत. आता भारतीयांच्या सौंदर्याचेही कौतुक होत आहे.

रेडिटच्या वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या देशांतील लोकांना अपव्होट केले. यामध्ये भारतीयांना सर्वाधिक 2,628 अपव्होट मिळाले आहेत. तर अमेरिकेला फक्त 1,936 अपव्होट मिळाले. Reddit वापरकर्त्यांनी भारतीयांसाठी सर्वात आकर्षक, सुंदर, देखणा, भव्य, चांगले, हॉट आणि सेक्सी शब्द वापरले आहेत आणि सर्वाधिक अपवोट दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...