आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • AIIMS Chief Dr Randeep Guleria India Corona Virus Cases R Value Inching Up Containment Strategies

कोरोनाच्या R- व्हॅल्यूने अडचण वाढवली:एका पॉझिटिव्हमुळे दुसऱ्यात संक्रमणाची शक्यता वाढली, सरकार म्हणाले - जेथे पॉझिटिव्हिटी रेट 10% जास्त तिथे निर्बंध कठोर करा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेल्टाने संक्रमित व्यक्तीपासून संपूर्ण कुटुंब असुरक्षित

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर उभ्या असलेल्या भारतातील 'R-व्हॅल्यू' ने चिंता वाढवली आहे. दिल्ली एम्सचे प्रमुख डॉ रणदीप गुलेरिया म्हणाले की, R- व्हेल्यूचे .96 ने सुरू होऊन 1 पर्यंत जाणे चिंतेचे कारण आहे. याचा अर्थ असा की एका कोविड बाधीत व्यक्तीकडून संक्रमण पसरण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत, ट्रान्समिशनची साखळी तोडण्यासाठी 'टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट' धोरण स्वीकारावे लागेल. जेथे नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत त्या भागांमध्ये प्रतिबंधासाठी कठोर धोरणाची गरज आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना त्या सर्व जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लादण्यास सांगितले आहे जेथे पॉझिटिव्हीटी दर 10%पेक्षा जास्त आहे. केंद्रांनी म्हटले आहे की, राज्यांनी या भागात लोकांचा जमाव रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत. या राज्यांमध्ये केरळ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोराम, मणिपूर आणि मेघालय यांचा समावेश आहे.

R व्हॅल्यूने कसे वाढतात प्रकरणे?
डेटा शास्त्रज्ञांच्या मते, R फॅक्टर म्हणजे रीप्रोडक्शन रेट. हे सांगते की संक्रमित व्यक्तीद्वारे किती लोक संक्रमित आहेत किंवा होऊ शकतात. जर आर फॅक्टर 1.0 पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ प्रकरणे वाढत आहेत. तसेच, R फॅक्टर 1.0 पेक्षा कमी असणे किंवा कमी होणे हे केस कमी होण्याचे लक्षण आहे.

जर 100 लोकांना संसर्ग झाला असेल तर हे देखील समजले जाऊ शकते. जर ते 100 लोकांना संक्रमित करतात तर R व्हॅल्यू 1 असेल. परंतु जर ते 80 लोकांना संक्रमित करण्यास सक्षम असतील तर हे R व्हॅल्यू 0.80 असेल.

डेल्टाने संक्रमित व्यक्तीपासून संपूर्ण कुटुंब असुरक्षित
डॉ. गुलेरिया म्हणाले की गोवर किंवा चिकन पॉक्सचे 'R-व्हॅल्यू' 8 किंवा त्याहून अधिक असते, याचा अर्थ एक व्यक्ती इतर 8 लोकांना संक्रमित करू शकते. यावरून हे स्पष्ट होते की कोरोना विषाणू खूप संसर्गजन्य आहे. आपण पाहिले की दुसऱ्या लाटेदरम्यान संपूर्ण कुटुंब संक्रमित होत होते. कांजण्यांचेही असेच होते. त्याचप्रमाणे, डेल्टाची लागण झालेल्या व्यक्तीपासून संपूर्ण कुटुंब असुरक्षित असते.

केरळमधील वाढत्या प्रकरणांचे कारण शोधावे लागेल
एम्सचे प्रमुख म्हणाले की, सुरुवातीला केरळने साथीचा रोग चांगल्या प्रकारे रोखला आणि इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला. त्यांनी लसीकरण मोहीम हाती घेतली. असे असूनही, देशाच्या इतर भागांच्या तुलनेत प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. त्याचा अभ्यास करावा लागेल. याची कारणे शोधावी लागतील. प्रतिबंधाशी संबंधित नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही हे पाहावे लागेल.

अँटीबॉडीज असूनही काही भागांमध्ये प्रकरणे वाढली
डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, 'ब्राझीलच्या एका शहरात झालेल्या सर्व्हेवरुन कळाले की, 70% लोकसंख्येमध्ये अँटीबॉडी होती. तरीही येथे प्रकरणे वाढू लागली. अशा प्रकरणांमध्ये कट-ऑफ काय आहे आणि अँटीबॉडीही हळूहळू का कमी होते हे माहिती नाही. खरेतर अशा स्थितीत गंभीर संक्रमणाची शक्यता खूप कमी आहे. जसे की, केरळ आणि UK मध्ये लोक संक्रमित होत आहे, असे असू शकते की, ते दुसऱ्यांमध्ये पसरवत असतील. मात्र त्यांना गंभीर इन्फेक्शन होत नसेल.'

वाढत्या R-व्हॅल्यूने लॉकडाऊन लागू शकते का?

  • हो. निश्चितच. मात्र R व्हॅल्यू वाढत राहिली आणि 1.0 च्या जवळपास पोहोचली तर पुन्हा लॉकडाऊन लागू शकते. हा एक असा फॉर्मूला आहे ज्याला केंद्र आणि राज्य सरकार फॉलो करत आहे. यावेळी त्यांचा फोस पॉझिटिव्हिटी रेटवर आहे.
  • तज्ञांचे म्हणणे आहे की R व्हॅल्यू केवळ लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांद्वारे नियंत्रणात ठेवले जाऊ शकते. जर लोक बाहेर आले नाहीत तर संक्रमित व्यक्ती इतर लोकांना संक्रमित करू शकणार नाही. मे महिन्यातही R-व्हॅल्यू कमी होण्याचे मुख्य कारण लॉकडाऊन होते. मग दुसरी लाटही थंड होऊ लागली.
बातम्या आणखी आहेत...