आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • AIIMS Director Dr. Randeep Guleria And Medanta Chairman Dr. Naresh Trehan Gave Important Information About Black Fungus

ब्लॅक फंगसवर दोन सिनिअर डॉक्टरांचा सल्ला:डायबिटीज रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच स्टेरॉईड दिले जावे, लक्षण दिसल्यास त्वरित उपचार सुरु करावा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल काही लोकांमध्ये कोरोना विषाणूसोबतच दुसऱ्या आजाराचे लक्षण दिसून येत आहेत. तो आजार म्हणजे ब्लॅक फंगस. देशातील बर्‍याच राज्यात ब्लॅक फंगसच्या केस आढळून आल्या आहेत. तथापि, हा संसर्ग शुगरच्या रूग्णांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. याबाबत दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ नरेश त्रेहन यांनी शुक्रवारी यासंबंधी विविध महत्त्वपूर्ण माहिती दिली.

रुग्णांना स्टेरॉईडचा सौम्य डोस द्यावा
ब्लॅक फंगसपासून बचाव करण्यासाठी लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. हे टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांना केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्टेरॉईडचा देण्यात यावे. तसेच, केवळ स्टेरॉईडचा सौम्य आणि मध्यम डोस रुग्णाला दिला जावा.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत स्टेरॉईड इंजेक्शनचा वापर वाढला
कोरोना संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेत स्टेरॉईड इंजेक्शनचा वापर वाढला. आजकाल असे दिसून येत आहे की, रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर हे इंजेक्शन अधिक वापरत आहेत. स्टेरॉईड दिल्यानंतर रक्तातील साखर वाढण्याचा धोका जास्त राहतो.

स्टेरॉईड घेत असाल तर ब्लड शुगर चेक करत राहा
एखादा व्यक्ती बऱ्याच काळापासून स्टेरॉईड घेत असेल तर मधुमेहासारखी समस्या उद्भवू शकते. यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. या आजारात म्यूकोरमायसिस म्हणजे ब्लॅक फंगस सामान्य आहे. एस्परगिलोसिससारखे फंगल संक्रमणदेखील होऊ शकते. म्हणूनच, स्टेरॉईड घेत असल्यास, रक्तातील साखर तपासली पाहिजे.

ब्लॅक फंगसच्या लक्षणांबद्दल सावधगिरी बाळगा: डॉक्टर
ब्लॅक फंगसच्या लक्षणांविषयी, मेदांताचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहन यांनी सांगितले की, नाकात वेदना, गालावर सूज येणे, तोंडात बुरशीचे ठिपके, पापणीवर सूज येणे, डोळ्यात वेदना किंवा अंगावर सूज येणे. अशी लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते.

ते म्हणाले की, ब्लॅक फंगसवर नियंत्रण मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्टेरॉईडचा योग्य वापर करणे आणि मधुमेह नियंत्रित करणे. यासोबतच त्यांनी हीसुद्धा माहिती दिली की, ब्लॅक फंगस विशेषतः मातीत आढळतो. जे निरोगी आहेत त्यांच्यावर हा हल्ला करु शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...