आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामारीत दिलासादायक बातमी:कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर गंभीर परिणाम होण्याचे संकेत नाहीत : एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमकुवत होत असलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान आणखी एक दिलासादायक बातमी आली आहे. सरकारनुसार,आतापर्यंत असे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर गंभीर परिणाम होईल. आत्तापर्यंत असे म्हटले जात होते की, याचा परिणाम सर्वात जास्त मुलांवर होईल.

सोमवारी आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग फारच कमी दिसून आला आहे. आतापर्यंत असे दिसून येत नाही की, तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग दिसून येईल. असे म्हटले जात आहे की, मुलं सर्वात जास्त संक्रमित होतील, परंतु बालरोग असोसिएशनने म्हटले आहे की, हे फॅक्टवर आधारित नाही. याचा मुलांवर परिणाम होऊ नये, यासाठी लोकांनी घाबरू नये.

ब्लॅक फंगस आणि कोरोनावर एकत्र उपचार करणे आव्हान
ब्लॅक फंगसबद्दल डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोनासह ब्लॅक फंगसचे प्रकरणे समोर येत आहेत. काळ्या बुरशीचे उपचार बराच काळ चालतो. बर्‍याच वेळा शस्त्रक्रिया देखील करावी लागते. काही लोक कोरोना पॉझिटिव्ह देखील असतात. उपचारादरम्यान, त्यांचा अहवाल निगेटिव्ह होतो. अशा परिस्थितीत रुग्णालयासमोर असे आव्हान आहे की,अशा रुग्णांसाठी दोन वॉर्ड तयार करावे लागत आहेत.

बातम्या आणखी आहेत...