आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गृहमंत्री अमित शाहांना शनिवारी उशीरा रात्री 11 वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आले. एम्सने रविवारी आपले वक्तव्य जारी केले. अमित शाह यांना संसदेच्या पावसाठी अधिवलेशनापूर्वी संपूर्ण मेडिकल चेकअपसाठी दाखल करण्यात आले आहे. एक-दोन दिवसांपर्यंत हे चेकअप सुरू राहिल. 30 ऑगस्टला कोविडवर मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तेव्हाच त्यांना पुन्हा एकदा चेकअप करण्यात सल्ला देण्यात आला होता.
यापूर्वी शनिवारीही वृत्त आले होते की, शाह यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. 55 वर्षांच्या शाह यांना 30 ऑगस्टला पोस्ट कोविड केअरनंतर रुग्णालयातून सुट्टी मिळाली होती. त्यांना पोस्ट कोविड केअरसाठी 18 ऑगस्टला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
त्यावेळी त्यांच्या शरीरात वेदना, थकवा आणि चक्कर यासारखा त्रास होत होता. एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरियांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र तेव्हा एम्सकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
2 ऑगस्टला रिपोर्ट आला होता पॉझिटिव्ह
शाह यांचा कोरोना रिपोर्ट 2 ऑगस्टला पॉझिटिव्ह आला होता. मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. 14 ऑगस्टला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली होती.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Amit Shah (@AmitShah) August 2, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.