आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गुजरातमध्ये कोरोनाविरुद्धचे युद्ध कमजाेर होत आहे. “भास्कर’ने अशा बेजबाबदार भास्कर स्टिंगने पर्दाफाश केला आहे. येथील लाेकांनी रिपाेर्ट निगेटिव्ह यावा म्हणून आरटी-पीसीआरचे १,३०० पेक्षा जास्त किट चाचणीसाठी रिकामेच प्रयोगशाळेत पाठवले असल्याचे उघड झाले अाहे. कंत्राटी ट्रेसिंगचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हा गाेंधळ झाला असल्याचे दिसून अाले अाहे. भास्कर राजकाेटच्या या स्टिंगमुळे गाेरखधंद्याचा पर्दाफाश झाला े. राजकाेटच्या पडधरी येथील खाेडापिपर अाराेग्य केंद्र अाणि येथील कर्मचारी बनावट नमुने घेताना रंगेहाथ पकडले गेले अाहेत. येथील लाेकांनी १,३०० पेक्षा जास्त किटही वाया घालवले अाहेत. इतकेच नाही तर नमुन्यावर नाव अाणि क्रमांकही बनावट टाकल्याचे दिसून अाले. अाराेग्य कर्मचाऱ्याचा माेबाइल क्रमांक लिहून पाठवण्यात अाले, मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी चाैकशीचे अादेश दिले अाहेत.
लॅब टेक्निशियनला चूक मान्य, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खडसावताच जीभ अडखळली
लॅब टेक्निशियन दीप्ती बहन खाखरिया
1. आज किती नमुने पाठवले?
- २५ नमुने पाठवले अाहेत.
2. नमुने कुणी घेतले, कुणाची जबाबदारी?
- नमुने घेण्याचे काम मीच करते अाणि मीच नमुने घेतले
3. अाज तुम्ही अाराेग्य केंद्रात अाला नाहीत, सुट्टीवर अाहात का?
- हाे (घाबरून) अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार नमुने पाठवले.
4. ज्यांचे नमुने पाठवले होते त्यांना आरोग्य केंद्रात बोलावण्यात आले? त्यांचे नमुने घेतले होते का?
- नाही, कुणालाही बाेलावले नाही आणि कुणाचाही नमुना घेतला नाही.
5. .. मग तू असं का करत आहेस?
- वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून लक्ष्य पूर्ण करण्यासाठी, अशी नावे लिहून ट्यूब पाठवल्या जातात
(फोनवरील संभाषण)
किटची ट्यूब रिकामी, यात ठेवले जातात नमुने
अारटी-पीसीअार चाचणीसाठी व्हीटीएम किटमध्ये रसायनाने भरलेली एक ट्यूब असते. रुग्णाच्या नाक अाणि घशातून घेतलेले नमुने याच ट्यूबमध्ये सील करून ठेवले जातात. नंतर रुग्णाचे नाव, माेबाइल क्रमांक लिहून प्रयाेगशाळेकडे पाठवले जाते.
पडधरीचे खोडापिपर अाराेग्य केंद्र
वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर डोबरिया
1. तुम्ही वैद्यकीय अधिकारी अाहात, तुम्ही नमुने घेता का ?
- नाही. मी नमुने घेत नाही.
2. अाज तुम्ही नमुने घेतले हाेते?
- नाही, अाज घेतले नाही. मी तर केस पेपरवर लिहून देताे. नमुने बाहेर संकलित करतात.
3. लॅब टेक्निशयन सुट्टीवर अाहे. दुसरे कुणी नाही, मग नमुने कुणी घेतले ?
- हे ओपीडी रजिस्टर आहे, नमुना घेण्याचा सल्ला तुम्ही कोणत्या रुग्णाला दिला होता?
ओपीडी रजिस्टरमध्ये नाव न बघता डॉ. सागर यांनी मौन पाळले.
4. नमुना न घेता अशा ट्यूब चाचणीसाठी का पाठवत अाहात?
- पाॅझिटिव्ह अाले तर देखरेख करावी लागेल म्हणून (मग त्याची जीभ अडखळायला लागली)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.