आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन पक्षी Air Arabia​​​​​​​च्या विमानाला धडकले:कोईम्बतूर येथे झाली लँडिंग; प्रवाशांचा चांगलाच खोळंबा, शारजाहला निघाले होते विमान

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शारजाहला जाणाऱ्या एअर अरेबियाच्या विमानाला पक्षी धडकल्याची घटना समोर आली आहे. दोन पक्षी विमानाच्या डाव्या इंजिनला धडकले. त्यानंतर विमान कोईम्बतूर येथे उतरवण्यात आले. विमान दुर्घटनाग्रस्त होता होता वाचले. या प्रकारामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा मात्र चांगलाच खोळंबा झाला आहे. दरम्यान सर्व 164 प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.

जेव्हा पक्षी विमानाला धडकले, तेव्हा विमान धावपट्टीवरून जात होते. दोन्ही पक्षी इंजिनच्या ब्लेडला धडकेल. दोनपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. माध्यमांना संबोधित करताना, कोईम्बतूर विमानतळाचे संचालक एस. सेंथिल वलवन म्हणाले की, पक्ष्यांचे विमानांना धडकने आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. कोईम्बतूर विमानतळावरील सूत्रांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले की, विमानतळाजवळ कचरा टाकण्यास बंदी आहे. कारण, पक्षी सहसा डंपिंग साइटवर येतात.

गरज भासल्यास किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कोणतेही लढाऊ विमान महामार्गावर उतरण्यास सक्षम असेल. याबाबत चाचणी घेण्यात आली आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 16 वर फ्लाइटचे ट्रायल लँडिंग करण्यात आले. ही चाचणीही यशस्वी झाली आहे.

बर्ड स्ट्राईकमुळे होतात अपघात
आकाशात विमान उडताना काही वेळा पक्षी विमानाला येऊन धडकतात. अशा अपघातांना बर्ड स्ट्राईक म्हणतात. एखादा पक्षी विमानाला धडकल्यानंतर विमाने इंजिन कामे करणे बंद करते. पायलट्सला अशा परिस्थितीमधेय विमान चालवण्याची ट्रेनिंग पूर्वीपासूनच दिलेली असते. बहुतांश बर्ड स्ट्राइक प्लेन टेक ऑफ करताना किंवा लँड करताना होतात.

बंदुकीच्या गोळीपेक्षा धोकादायक ठरते पक्षाची धडक

19 जून 2022 रोजी तीन विमानांना देशात आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पहिले - पाटणा, दुसरे - दिल्ली आणि तिसरे गुवाहाटीमध्ये. यापैकी पाटणा आणि गुवाहाटी मधील विमानांना बर्ड हिटमुळे पुन्हा उतरावे लागले. उडत्या विमानाला पक्षी धडकल्यास त्याला बर्ड हिट म्हणतात. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या विमानाला एका छोट्या पक्ष्याने धडक दिल्याने विमानाचे असे किती नुकसान होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित होतो. चला, तर मग जाणून घ्या दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये या प्रश्नाचे उत्तर....येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...