आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीनगरमध्ये भारतीय हवाई दलाकडून एअर शो सुरू आहे. यामध्ये स्काय डायव्हिंग टीम आकाशसंगा, सूर्य किरण एरोबॅटिक आणि डिस्प्ले टीम डल लेकवर आपले हवाई कसरतींचे प्रदर्शन करत आहेत. पॅरामोटर फ्लाइंग हे देखील या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. हा शो 13 वर्षानंतर खोऱ्यात होत आहे. हवाई दलाचे सिम्फोनिक ऑर्केस्ट्राही यात सहभागी होत आहे.
श्रीनगर हवाई दल स्टेशन आणि जम्मू -काश्मीर प्रशासनाने 'आझादी का अमृत महोत्सव' सेलिब्रेशनचा भाग म्हणून एअर शो आयोजित केले आहेत, असे वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, एअर शोची थीम 'गिव विंग्स टू यॉर ड्रीम' आहे. खोऱ्यातील तरुणांना हवाई दलात सामील होण्यासाठी आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे.
हा एअर शो जम्मू-कश्मीरचे शेर-ए-कश्मीर इंटरनॅशनल कंवेन्शन सेंटरमध्ये आयोजित होत आहे. यामध्ये लेफ्टनेंट गव्हर्नर मनोज सिन्हा, वेस्टर्न एअर कमांडचे ऑफिसर कमांडिंग इन चीफ बी आर कृष्णासग अनेक प्रमुख पदाधिकारी सामिल झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.