आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Air Force Chief Was Among The First Indian Pilots To Fly Rafale; The Tail Number Of Plane Is RB 01 Which Stands For The Name Of Air Marshal RKS Bhadauria

एअरफोर्स चीफ आणि राफेलचे नाते:सर्वात आधी राफेल उडवणाऱ्या भारतीय वैमानिकांमध्ये वायुदल प्रमुख सामील, पहिल्या राफेल एअरक्राफ्टच्या टेल नंबरवर त्यांचे नाव

अंबाला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागच्या वर्षी जुलैमध्ये भारतीय वायुसेना आणि फ्रांस एअरफोर्सची एक्सरसाइज गरुडदरम्यान आरकेएस भदौरिया यांनी एक तास राफेल उडवले होते

वायुदल प्रमुख आरकेएस भदौरिया मागच्या वर्षी जेव्हा वायुसेना प्रमुख बनले, तेव्हा सर्वात जास्त चर्चा याच गोष्टी होती की, राफेल करार पुर्ण करण्यासाठी त्यांना वायुदल प्रमुख बनवले आहे. सर्वात आधी राफेल उडवणाऱ्या भारतीय वैमानिकांमध्ये वायुदल प्रमुख सामील, पहिल्या राफेल एअरक्राफ्टच्या टेल नंबरवर त्यांचे नाव आहे. एअर मार्शल आरकेएस भदौरिया डेप्यूटी चीफ म्हणून फ्रांससोबत राफेल डीलसाठी बनलेल्या टीमचे चेअरमन होते.

या पथकावर सर्व निगोशिएशन करण्याची जबाबदारी होती. राफेल उडवणाऱ्या ठराविक वैमानिकांच्या यादीत भदौरिया सामील आहेत. राफेल अंबालामध्ये आल्यानंतर वायुदल प्रमुख म्हणून, एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया त्यांचे स्वागत करतील.

मागच्या वर्षी जुलैमध्ये भारतीय वायुसेना आणि फ्रांस एअरफोर्सने एक जॉइंट एक्सरसाइजमध्ये भाग घेतला होता, याचे नाव 'गरुड' होते. या एक्सरसाइजदरम्यान एअरफोर्स चीफने एक तास राफेलची सवारी केली होती. यदारम्यान, त्यांनी सुखोई 30 एमकेआय आणि राफेलला सोबत ऑपरेट करण्यासंबंधी चर्चा केली होती.

फ्रांस आणि भारतादरम्यान सप्टेंबर 2016 मध्ये 58 हजार 891 कोटी रुपयांचा राफेल करार झाला होता, यात 36 विमाने खरेदी केली जाणार आहेत. या कराराच्या 67 महीन्यानंतर राफेल भारतात आले आहे. वायुसेनेला जे पहले राफेल मिळाले होते, ते एअरक्राफ्ट संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना मागच्या वर्षी 8 ऑक्टोबरला फ्रांसमध्ये दैसो एविएशनने सोपवले होते. त्या एअरक्राफ्टचा टेल नंबर आरबी-01 होता. आरबी वायुसेना प्रमुख राकेश भदौरिया यांचदे इनिशियल आहे.

एअर चीफ मार्शल भदौरिया जेव्हा वायुसेनेच्या फायटर पायलट स्ट्रीममध्ये कमिशन झाले, तेव्हा नॅशनल डिफेंस अकॅडमीमधून त्यांनी स्वार्ड ऑफ ऑनर मिळवला होता. त्यांच्याकडे 26 प्रकारचे फायटर आणि ट्रांसपोर्ट एअरक्राफ्ट उडवण्याचा अनुभव आहे. त्यांच्या नावे 4 हजारांपेक्षा जास्त फ्लाइंग आवर्स आहेत. ते एक्सपेरिमेंटल टेस्ट पायलट, कॅट-ए क्वालिफाइड फ्लाइंग इंस्ट्रक्टर आणि पायलट अटॅक इंस्ट्रक्टरदेखील आहेत.