आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Air India 45 Lakh Passenger Information Leaked, A Major Cyber Attack On Registered Passenger Information

हॅकिंग:एअर इंडियाच्या 45 लाख प्रवाशांची माहिती लीक, नोंदणीकृत प्रवाशांच्या माहितीवर मोठा सायबर हल्ला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअर इंडियाच्या ४५ लाख प्रवाशांचा डाटा लीक झाल्याची माहिती उजेडात आली असून या प्रवाशांच्या पासपोर्टपासून क्रेडिट कार्डपर्यंतची माहिती यात आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.

ऑगस्ट २०११ ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान नोंदणीकृत प्रवाशांच्या खासगी माहितीचा डाटा चोरण्यात आला असून यात भारतासह परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या प्रवाशांच्या जन्मतारखा, संपर्काची माहिती, नावे, पासपोर्ट आणि तिकिटे अशा माहितीचा समावेश आहे. याशिवाय, स्टार अलायन्स या जागतिक दर्जाच्या कंपनीचा डाटाही चोरीस गेला असून एअर इंडियाचा या कंपनीशी करार आहे. क्रेडिट कार्डचे सीव्हीव्ही आणि सीव्हीसी नंबर मात्र चोरीस गेलेले नाहीत, असे कंपनीने म्हटले आहे. डाटा चोरीची ही घटना एसआयटीए पीएसएसमधून झाली आहे. ही कंपनी स्वित्झर्लंडच्या जिनेव्हात असून कंपनीने सर्वप्रथम डाटा चोरीची माहिती २५ फेब्रुवारीला दिली होती. दरम्यान, या प्रकरणी तपासात बाहेर देशातील तज्ज्ञांची मदत घेतली जात असून एअर इंडियाच्या एफएफपी प्रोग्रामचा पासवर्डही बदलला जात आहे. प्रवाशांनाही आपापले पासवर्ड बदलण्यास सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...